मुंबईत अग्नितांडव, गोरेगावातील भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू
मुंबईतील गोरेगावमधील बहुमजली इमारतील आग लागून 7 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर अनेक वाहने जळून खाक झाले आहेत.
ADVERTISEMENT

Goregaon Fire : मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील एसआरएच्या जय भवानी इमारती (SRA Jay bhavani building) येथील जय भवानी नावाच्या इमारतीला काल पहाटे 2.30 ते 3 च्या दरम्यान आग लागली. या इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या या आगीत 7 जणांचा मृत्यू (7 Death) झाला असून 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दोन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीत जखमी झालेल्यांना कुपर आणि एचबीटी ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. इमारतीला आग लागल्याचे अग्निशमन दलाला समजताच 10 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
दोन मजल्यांना आग
जय भवानी इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर दोन्ही मजल्यावर आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे सात नागरिकांचा या आगीत मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
हे ही वाचा >> यमाच्या रेड्यावर बसून मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांची मौज, सामनातून सरकारवर आगपाखड
कपड्यांच्या चिंध्यानी जीव घेतले
अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु करण्यात आल्यानंतर आग कशामुळे लागली हेही सांगण्यात आले. इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्याचे गाठोडे ठेवण्यात आले होते. कपड्याच्या त्या चिंध्याना आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीन रौद्ररुप धारण करुन ती आग दोन मजल्यावर पसरली. त्यामुळेच नागरिकांचा जळून मृत्यू झाला आहे.
वाहनेही जळून खाक
इमारतीला लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्यामुळे पार्किंगमध्ये लावलेली वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यामध्ये इमारतीमधील 30 दुचाकी आणि कार आगीत जळून खाक झाल्या आहेत.
हे ही वाचा >> NCP Controversy: राष्ट्रवादी कुणाची ? आज काका-पुतणे आमनेसामने…
इमारतीत धुराचे लोट
कपड्याच्या चिंध्यामुळे आग लागल्यामुळे धुराचे लोट इमारतीमध्ये पसरले होते. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. मात्र ज्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी आगीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून इमारतीमधील आणखी कोणी जखमी झाले आहे का त्याचीही माहिती घेण्यात येत आहे.