OYO मध्ये 4 मित्रांसोबत गेला नंतर छतावरून मारावी लागली उडी, भयंकर घटना
ओयो गेस्ट हाऊसमध्ये 23 वर्षीय तरुणाला नशेचे कोल्ड्रिंक देऊन चार जणांनी त्याच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणाला कोंडून ठेवत चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केले.
ADVERTISEMENT
Crime News In marathi : चार मित्रांनी OYO हॉटेलला बोलावलं म्हणून तो विश्वास ठेवून गेला. पण, हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत आयुष्यभर विसरता न येणारी घटना घडली. चार मित्रांच्या तावडीतून सुटका करून घेत त्याने छतावरून उडी मारली. पण, तोपर्यंत जे व्हायला नको होतं, ते होऊन गेलं होत.
ADVERTISEMENT
फरीदाबादमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ओयो हॉटेलमध्ये चार मित्रांनी एका तरुणाला बोलावून नशा मिसळवलेले कोल्ड्रिंक पाजले आणि नंतर त्याच्यावर अत्याचार केले. पीडित तरुणाने त्यांची नजर चुकवून छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला. बंधक बनवून आरोपींनी पाच हजार रुपये लुटल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
पीडित तरुणावर सुरू आहेत उपचार
दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक क्रूर घटना समोर आली आहे. ओयो गेस्ट हाऊसमध्ये 23 वर्षीय तरुणाला नशेचे कोल्ड्रिंक देऊन चार जणांनी त्याच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणाला कोंडून ठेवत चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केले.
26 मे रोजी रात्री ही घटना घडली. पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याने OYO च्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला आणि पोलिसांत तक्रार केली.
हेही वाचा >> ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप
तक्रार नोंदवून आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्याला धमकावल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. नंतर हे प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
पीडित तरुणाने सांगितले की, ज्या तरुणांनी त्याच्यावर अत्याचार केला, ते लोक त्याच्या मित्रासोबत आले होते. पीडित तरुणाचा आरोप आहे की 25 मे रोजी संध्याकाळी त्याचा मित्र राकेश शेहरावत याने त्याला OYO येथे भेटण्यासाठी बोलावले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> kandivali murder : आला अन् तरुणाला घातली गोळी, कांदिवलीत भरदिवसा थरार
यानंतर, जेव्हा तो ओयो हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला कोल्ड ड्रिंकमध्ये काही मद्य देण्यात आले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. यानंतर मित्र राकेश सेहरावतने त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले, असा पीडित तरुणाचा आरोप आहे.
एवढेच नाही तर राकेश सेहरावतने त्याच्या इतर तीन मित्रांनाही ओयो रूममध्ये बोलावले आणि सर्वांनी त्याच्यावर अत्याचार केले. पीडित तरुणाचा आरोप आहे की जेव्हा त्याने ओयो सोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याला ओलीस ठेवले आणि मारहाण करून 5,000 रुपये काढून घेतले. नंतर संधी पाहून त्याने ओयोच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT