Gadchiroli: भरवला विषाचा घास… घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

gadchiroli 5 death mystery daughter in law and aunt killed brutally 5 members of the same family with poison stir in vidarbha
gadchiroli 5 death mystery daughter in law and aunt killed brutally 5 members of the same family with poison stir in vidarbha
social share
google news

Gadchiroli 5 Death Mystery: व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: आधी पती-पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत लागोपाठ 5 जणांच्या रहस्यमय मृत्यूने गडचिरोली जिल्ह्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आला आहे. अन्न-पाण्यात विष मिसळून या पाचही जणांची पद्धतशीरपणे हत्या केल्याचं आता समोर आले. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीसोबत मिळून हे पाऊल उचललं असल्याची अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. (gadchiroli 5 death mystery daughter in law and aunt killed brutally 5 members of the same family with poison stir in vidarbha)

ADVERTISEMENT

मृतांची नावं

1. शंकर तिरुजी कुंभारे (वय 52 वर्ष)

2 विजया शंकर कुंभारे,

3. कोमल विनोद दहागावकर – विवाहित कन्या (वय 29 वर्ष, रा. गडअहेरी)

4. मावशी आनंदा उराडे (वय 50 वर्ष, रा. चंद्रपूर)

ADVERTISEMENT

5. मुलगा रोशन शंकर कुंभारे (वय 28 वर्ष)

ADVERTISEMENT

अशी मयतांची नावे आहेत.

दरम्यान या प्रकरणी आरोपी सून संघमित्रा रोशन कुंभारे (वय 25 वर्ष) आणि रोशनची मामी रोजा रामटेके (वय 52 वर्ष) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी चंद्रपूरला नेलं. पण त्यानंतर शंकर यांचीही अचानक प्रकृती खालावली.

हे ही वाचा>> PSI Somnath zende : Dream11 मुळे निलंबन, PSI झेंडे कसे फसले?; अधिकाऱ्याने सांगितली Inside Story

दोघांनाही चांगले उपचार मिळावे यासाठी त्यांना नागपूरला हलविण्यात आलं. पण उपचार सुरु असतानाच 26 सप्टेंबर रोजी शंकर तर 27 सप्टेंबर रोजी विजया यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा शंकर कुंभारे यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (वय 29 वर्ष, रा. गडअहेरी) ही माहेरी आली होती. पण काही दिवसांनी तिची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिला देखील उपचारासाठी चंद्रपूरला नेण्यात आलं. पण ८ ऑक्टोबरला तिने वाटेतच प्राण सोडले.

हे ही वाचा >> ह्रदयद्रावक! 2 वर्षाच्या चिमुकलीचा घोटला गळा, सोफ्याखाली लपवला मृतदेह; कारण…

दुसरीकडे शंकर कुंभारे यांचा मुलगा रोशन कुंभारे (वय 28 वर्ष ) याचा पुढच्या आठ दिवसातच म्हणजे 15 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्याचवेळी रोशनची मावशी आनंदा उंदीरवाडे (वय 50 वर्ष, रा. चंद्रपूर) ही महागावला आली होती. पण तिची देखील प्रकृती खालावल्याने चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान म्हणजे 14 ऑक्टोबरला मध्यरात्री तिचीबी प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूने संपूर्ण अहेरी तालुका हादरुन गेला होता. सुरुवातीला या सगळ्या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. पण नंतर हा घातपाताचा प्रकार असावा अशा संशय व्यक्त करण्यात आल्याने या सगळ्या प्रकरणाला नवं वळण मिळालं. जे अखेर आता उजेडात आलं आहे.

एकाच कुटुंबातील 5 जणांची का केली सून आणि मामीने हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती स्वत: उच्चशिक्षित आहे. संघमित्रा आणि रोशन कुंभारे हे एकत्रच पोस्ट खात्यात काम करत होते. तेथेच त्यांचे सूत जुळले होते. डिसेंबर 2022 मध्ये त्या दोघांनी विवाह केला. पण संघमित्राच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता.

संघमित्राच्या लग्नानंतर तिच्या वडिलांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल 2023 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. ज्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्यातच सासरचे लोक छळ करत असल्याचं म्हणत तिने त्यांना थेट संपविण्याचाच कट रचला.

दोन महिलांनी या पाच जणांची केली हत्या

 

संघमित्राचा पती रोशन याची मामी रोजा रामटेके ही महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही कुंभारे कुटुंबीयांबाबत राग होता. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट अतिशय थंड डोक्याने आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

हे ही वाचा>> धक्कादायक! सख्ख्या बहिणीला वेश्या म्हणून विकलं, तीन मुलं असलेल्या पुरूषाकडेच..

संघमित्रा कुंभारे हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले. 20 दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

सध्या या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. रोशनच्या आई-वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी (रा.महागाव) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT