Murder Case : मित्राच्या बहिणीवर जडलं प्रेम, भावाने मित्राचाच घेतला जीव!
मित्राचे बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती भावाला समजल्यानंतर त्याने मित्राला समजावून सांगितली. मात्र तरीही बहिणीचे आणि मित्राचे प्रेमसंबंध सुरुच होते. भेटणे, मोबाईलवर बोलणे हे प्रकरण सुरुच असल्याने संतापलेल्या भावाने मित्रालाच संपवून टाकले.
ADVERTISEMENT
Gondia Murder : प्रेमप्रकरणातून गोंदिया जिल्ह्यात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. कारण मित्रानेच (Friend) मित्राची हत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हत्या (Murder) करण्यात आलेल्या प्रकरणातील तरुणाचे मित्राच्या बहिणीवर प्रेम होते. त्या प्रेमप्रकरणामुळे (Love Affairs) मित्राची बहीण आणि तरुण भेटत होते. मोबाईलवर बोलतही होते. या प्रेमाची माहिती भावाला समजल्यानंतर त्याने आपल्या बहिणीलाही आणि भावालाही समजवले होते. मात्र त्यानंतरही त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरुच होते.
ADVERTISEMENT
मित्राचे सूत बहिणीबरोबर जुळले
भावाने मित्राला समजावून सांगितल्यानंतरही बहिणीचे आणि मित्राचे प्रेमप्रकरण सुरुच होते. या गोष्टीचा राग भावाच्या मनात प्रचंड होता. त्यामुळे त्याने पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. बहिणीबरोबर सुरु असलेल्या प्रेमप्रकरणावरुन त्याने नंतर मित्राबरोबर वादही घातला होता.
हे ही वाचा >> Crime News: किर्रर.. अंधारात गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् तरुणाचा जीवच गेला!
मित्राबरोबर घातला वाद
आपल्या बहिणीबरोबर चाललेल्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या भावाने मित्राबरोबर वाद घातला आणि त्याची हत्या केली. ही घटना घडली आहे गोंदिया जिल्ह्यातील कुडवामधील. बहिणीच्या प्रेमप्रकरणाच शेवट अशा रक्तरंजित झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या युवकाचे नाव प्रज्वल अनिल मेश्राम असं आहे.
हे वाचलं का?
भावाचा राग अनावर
या प्रकरणाची रामनगर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ज्या मित्राची हत्या करण्यात आली आहे. ती हत्या करणारे हे तिघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र बहिणीबरोबर चालू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे भावाचा मित्रावर राग होता. त्यामुळे त्याने त्याला घरातून बाहेर बोलवून त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मित्राची हत्या केल्याप्रकरणी आरोपी संकेत बोरकर आणि आदर्श भगत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का त्याचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT