Rape Case: अश्लील Video शूट करून दोन भावांचा बहिणीवर गँगरेप, गर्भवती झाल्यावर…
चुलत बहिणीच्या घरी कोणीच नसताना दोघा भावांनी तिचे हात बांधून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हरियाणात घडली आहे. बलात्कार केल्याचा व्हिडीओ बनवून त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला होता. गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पालकांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
Gangrape Case: हरियाणातील पलवल जिल्ह्यामध्ये (Haryana Palwal) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हसनपूर पोलीस स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या दोन चुलत भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. सामुहिक बलात्कार (Gangrape) केल्यानंतर पीडितेचाही अश्लील व्हिडीओही (Porn Video) बनवण्यात आला होता. तो व्हिडीओ त्या दोघांनी व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्काराची केला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
एकटी असताना साधला डाव
हसनपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीने त्यांना सांगितले की, 7 महिन्यांपूर्वी ती घरी एकटी असताना तिच्या चुलत भावांनी घरात येऊन आधी तिचे हात बांधले. त्यानंतर तिच्यावर दोघांनी बलात्कार केला होता. यावेळी त्या दोघा नराधमांनी तिचा अश्लील व्हिडिओही बनवला होता.
हे ही वाचा >> Pushpa चित्रपटातील अभिनेत्याला अटक, अभिनेत्रीसोबत नको ते केलं अन्…
गर्भपाताच्या दिल्या गोळ्या
त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर त्या दोघांनी वारंवार तिच्यावर बलात्कार केला होता. त्यामुळे ती काही दिवसांनी गरोदरही राहिली. यावेळी त्या दोघांनी तिला गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या होत्या. मुलीला प्रचंड त्रास देण्यात आल्यामुळेच मुलीने ही बाब घराच्यांच्या कानावर घातली, त्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हे वाचलं का?
व्हिडीओ व्हायरल करू
त्याचवेळी पलवल कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत आणखी एका प्रकरणात लग्नाच्या बहाण्याने मुलीवर महिनाभर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या तरुणीने तक्रार दिली आहे की, एक तरुण तिच्याशी 6 महिन्यांपासून फोनवर बोलत होता. त्यावेळी तिला त्याने लग्नाचेही आमिष दाखवले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली होती. त्यामुळे आता त्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हे ही वाचा >> Crime: मुंबईतील महिला डॉक्टरचा न्यूड व्हिडीओ केला शूट, ‘हा’ व्यक्ती करायचा नको ते!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT