PM मोदी फॉलोअर असलेल्या हिंदुत्ववादी महिलेला गुजरातमध्ये अटक : कोण आहे काजल हिंदुस्तानी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Hinduist leader Kajal Hindustani, arrested for allegedly giving hate speech
Hinduist leader Kajal Hindustani, arrested for allegedly giving hate speech
social share
google news

उना : रामनवमीदिवशी प्रक्षोभक भाषण (हेट स्पीच) केल्याप्रकरणी काजल हिंदुस्तानीला (Kajal Hindustani) गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) अटक केली आहे. काजल हिंदुस्तानीच्या भाषणामुळेच 1 एप्रिल रोजी गुजरातमधील उना येथे जातीय हिंसाचार उफळला असा पोलिसांचा दावा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुजरात पोलीस आठवडाभरापासून काजल हिंदुस्तानीच्या शोधात होते. पण ती पोलिसांना गुंगारा देत होती, अखेर रविवारी तिनेच पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी तिला गिर सोमनाथ जिल्ह्यातून अटक केली आहे. (Hinduist leader Kajal Hindustani, arrested for allegedly giving hate speech)

ADVERTISEMENT

कोण आहे काजल हिंदुस्तानी?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, काजल हिंदुस्तानीचे नाव काजल सिंगला आहे. ती गुजरातमधील जामनगर शहरातील रहिवासी आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचा आणि विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासाठी प्रचार केला होता, असा दावा काजल हिंदुस्तानीने केला आहे.

गॅंगरेपचे आरोपी 13 पोलीस कर्मचारी निर्दोष; तपासात निष्काळजीपणा केल्याने कोर्टाने फटकारले

काजल हिंदुस्तानीने तिच्या ट्विटर बायोमध्ये सविस्तर परिचय दिला आहे. तिने स्वत:चे वर्णन, एक उद्योजिका, संशोधन विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता, नॅशनलिस्ट आणि ‘प्राऊड इंडियन’ असे केले आहे. काजल हिंदुस्तानीला ट्विटरवर सुमारे 94 हजार जण फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तारेक फताह आणि कपिल मिश्रा यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये काजल नियमितपणे सहभागी होत असते. मागील काही दिवसांपासून त्याची वेबसाइट लॉक झालेली दिसत आहे.

Crime : शिक्षिका बनायचं होतं पिंकीला; सासरच्यांना पटलं नाही, मारून टाकलं

हे नाव वादात कसे आले?

गुजरातमधील गीर सोमनाथ येथील उना येथे 30 मार्च रोजी रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्यावतीने हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काजल हिंदुस्थानीने एका विशिष्ट समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. काजल हिंदुस्तानीच्या या भाषणानंतर उनामध्ये 2 दिवस जातीय तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजीही 2 समुदायांमध्ये दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणी, 2 एप्रिल रोजी पोलिसांनी काजल हिंदुस्तानीवर IPC कलम 295A (जाणूनबुजून समाजातील कोणत्याही घटकाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असलेले विधान) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT