लव्ह मॅरेज केलं, पण इंस्टाग्राममुळे झाला भयंकर शेवट, दोन लेकरांसमोरच पतीने…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

instagram followers increased wife monika husband murdered Sultanpur uttar pradesh crime story
instagram followers increased wife monika husband murdered Sultanpur uttar pradesh crime story
social share
google news

Instagram Wife Killed Husband : आजकल इंस्टाग्रामचा जमाना आहे, जो तो इंस्टाग्रामवर स्वत:चे व्हिडिओ अपलोड करून फॉलोवर्स वाढवत असतो. मात्र याच इंस्टाग्रामने आता एक कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. त्याचं झालं असं की, पत्नी दिसायला खुपच सुंदर होती. त्यामुळे तिच्या व्हिडिओला खूप पसंती मिळायची. यामुळे दिवसागणिक तिचे फॉलोवर्स वाढत होते. या सर्व प्रकाराची नवऱ्याला चीड येत होती. यातूनच आता पतीने बायकोची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने आता उत्तर प्रदेश हादरलं आहे. (instagram followers increased wife monika husband murdered Sultanpur uttar pradesh crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत हत्या झालेल्या महिलेचे नाव मोनिका गुप्ता (32) होते. तर तिच्या पतीचे नाव राहुल मिश्रा (37) आहे. 15 वर्षापूर्वी 2008 साली दोघाचे लव्ह मॅरेज झाले होते. मोनिका ही रायबरेलीची तर राहुल हा उन्नावचा रहिवासी होता. दोघाचे लग्न झाल्यानंतर दोघेही लखनऊमध्ये राहायला होते. राहुल हा टूअर अँड़ ट्रॅव्हल्सचा मालक आहे. या लग्नापासून दोघांना दोन मुले आहेत. एक 12 वर्षाची मुलगी आहे, तर एक 5 वर्षाचा मुलगा आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात ऑनर किलिंग! 16 वर्षाच्या लेकीची कोयत्याने हत्या, मृतदेह जाळला; कारण…

राहुल पत्नी मोनिकासह दोन मुलांना घेऊन लखनऊवरून माहेरी जायला निघाला होता. या दरम्यान त्याने मार्ग बदलत पुर्वाचल एक्सप्रेसच्या सु्ल्तानपूर परिसरात जाऊन कार रोखली होती. यानंतर राहुलने कारमध्येच दोन मुलांच्या डोळ्यासमोरच मोनिकाची हत्या केली. वडिल आईला मारत असल्याचे पाहून मुलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी काही एक न एकता मोनिकाची हत्या केली. या हत्येनंतर राहुल त्याच्या दोन मुलांसह कारमध्येच बसून होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या दरम्यान पुर्वाचल एक्सप्रेसचे कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना हायवेवर एक कार उभी असलेली दिसून आली. अनेक तासापासून ही कार अशीच उभी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय बळावला. हे कर्मचारी कारनजीक पोहोचताच राहुलने दरवाजा उघडलाच  नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना य़ा घटनेची माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत राहुलला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यावेळी दरवाजा उघडताच आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता, तर तिच्या मुलांनी वडिलांनी आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांंना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपी राहुल मिश्राला अटक केली होती.

हत्येमागचं कारण काय?

पोलीस चौकशीत राहुल मिश्राने हत्येमागचं धक्कादायक कारण सांगितले. मी माझ्या व्यवसायात व्यस्त असायचो, तर मोनिका इस्टाग्रामवर अ‍ॅक्टीव्ह असायची. मोनिका दिसायला खुप सूंदर असल्य़ाने तिचे फॉलोवर्स दररोज वाढायचे. राहुल तिची इंस्टाग्राम अ‍ॅक्टीव्हीटी चेक करायचा म्हणून तिने त्याला ब्लॉक केले होते. यामुळे राहुलचा मोनिकावर संशय वाढला होता. तसेच तो कामात व्यस्त असताना मोनिका इस्टाग्रामवरील मित्रांशी भेटायची असा त्याला संशय होता. या संशयातून राहुलने मोनिकाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime :नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने मित्रासोबत मिळून…, घटनाक्रम पाहून पोलीसही चक्रावले

या प्रकरणात पोलिसांनी आता राहुल मिश्राने याला अटक करून त्याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT