Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Maharashtra RPF constable opened fire inside the Jaipur Express train after it crossed Palghar station. The accused shot the RPF ASI and three other passengers and jumped out of the train near Dahisar station.
Maharashtra RPF constable opened fire inside the Jaipur Express train after it crossed Palghar station. The accused shot the RPF ASI and three other passengers and jumped out of the train near Dahisar station.
social share
google news

Jaipur mumbai train firing news : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसने पालघर स्टेशन सोडलं आणि त्यानंतर काही वेळातच गाडीत भयंकर घटना घडली. सोमवारी (31 जुलै) पहाटे साडेपाच वाजता धावत्या रेल्वेमध्ये गोळीबार करण्यात आला. जयपूर-मुंबई सुपरफास्ट ट्रेनमधील बोगी क्रमांक 5 मध्ये झालेल्या या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह 3 प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतनने अंदाधूंद गोळीबार केल्यानंतर धावत्या गाडीतूनच खाली उडी घेतली. (Four people have died in the firing on the Jaipur-Mumbai passenger train. This train was coming from Gujarat to Mumbai.)

ADVERTISEMENT

वापी ते बोरीवली मीरा रोड स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर जीआरपी मुंबईच्या जवानांनी आरोपी कॉन्स्टेबलला मीरा रोड, बोरिवली येथे अटक केली आणि त्यानंतर आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही आरपीएफचे जवान ड्युटीवर होते आणि कार्यालयीन कामासाठी मुंबईत येत होते. आरोपी जवानाने आपल्या सर्व्हिस गनमधून गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितलं.

कोणत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला?

जयपूर एक्सप्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेस (12956) बी-5 बोगीमध्ये गोळीबार झाला. ट्रेन जयपूरहून मुंबईकडे येत होती.

हे वाचलं का?

गोळीबार कधी आणि कुठे झाला?

पालघर स्थानकापासून काही अंतरावर ट्रेन गेल्यानंतर हे घडल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे 5.23 वाजता वापी ते बोरिवली स्थानकादरम्यान आरपीएफ कॉन्स्टेबलने अचानक गोळीबार केला.

गोळीबारात कुणाचा झालाय मृत्यू?

या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक आरपीएफ एएसआय टिकाराम मीना आणि तीन प्रवासी आहे. मृत्यू झालेले तिन्ही प्रवासी एकाच कुटुंबीतील असून, ते बोरिवली येथे येत होते, अशी माहिती मिळाली आहे. टिकाराम हे एस्कॉर्ट प्रभारी होते.

ADVERTISEMENT

गोळीबार करणारा जवान कोण?

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन असल्याचे सांगण्यात येत आहे. चेतन एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने ट्रेनमधून उडी मारली. मात्र, मीरा रोड, बोरिवलीजवळ त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

रेल्वे प्रशासनाने काय सांगितले?

पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. आरोपीने आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या आणि दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!

पश्चिम रेल्वे मुंबईचे डीसीपी संदीप व्ही. यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, ‘प्राथमिक तपासात आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे आढळून आले आहे.’ दरम्यान, त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती तर त्यांना ड्युटीवर का तैनात करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?

आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने गोळीबार का केला, हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस ट्रेनमधील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT