Crime : बायको आणि दोन मुलींची हातोडीने ठेचून हत्या, मजूराने स्वत:चचं कुटुंब का संपवलं?
आरोपीचा मृत पत्नी किरण यादवसोबत प्रेमविवाह झाला होता. या लग्नापासून त्यांना दोन मुली होत्या. चौघांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होते. या दरम्यान आरोपीने 2 लाखाचे कर्ज घेऊन मेहुणीचे लग्न लावले होते.
ADVERTISEMENT
Jaipur Triple Murder : जयपूरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. घरातल्या कुटुंब प्रमुखानेच हे धक्कादायक कृत्य केले आहे. आरोपीने त्याची बायको आणि दोन मुलींची हातोडीने ठेचून हत्या केली आहे. किरण यादव (32), मोठी मुलगी प्रिया (11) आणि छोटी मुलगी रिया (6) अशी या मृतांची नावे आहेत. आरोपीने या तिघांची हत्या करून त्याचं सपूर्ण कुटुंबच संपवलं आहे. या घटनेने सध्या जयपूर हादरलं आहे. (jaipur triple murder case man killed her wife and two daughter shocking crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ही घटना 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी सरना डुंगर परिसरात घडली आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अमित कुमार याने 17 नोव्हेंबरच्या रात्री आपल्या खोलीत झोपलेल्या पत्नी किरण आणि मोठी मुलगी प्रिया हिच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार हल्ला करून त्यांची हत्या केली. या हत्येनंतर तो त्याच्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या करणार होता. मात्र आपल्या 5 वर्षाच्या चिमुकलीला पाहून त्याचे हात थरथर कापू लागले होते. त्यामुळे काहीकाळासाठी तो थांबला.
हे ही वाचा : ”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं
पत्नी आणि मोठ्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने छोटी मुलगी रियाला बाहेर फिरायला नेले. त्यानंतर दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केले आणि दिवसभर फिरून 18 नोव्हेंबरला रात्री झोपण्यासाठी घरी आले. यावेळी पत्नी आणि मोठ्या मुलीचे मृतदेह एका खोलीत पडले होते. तर लहान मुलीला दुसऱ्या खोलीत झोपवले होते. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा त्याने रियावरही हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली.
हे वाचलं का?
आरोपीचा मृत पत्नी किरण यादवसोबत प्रेमविवाह झाला होता. या लग्नापासून त्यांना दोन मुली होत्या. चौघांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होते. या दरम्यान आरोपीने 2 लाखाचे कर्ज घेऊन मेहुणीचे लग्न लावले होते. या कर्जानंतर तो मानसिकदृष्ट्या खुपच कमकुवत झाला होता. कर्जामुळे घरात रोज भांडणे होत होती. आरोपी हा अगरबत्तीच्या गोदामात मजूरीचे काम करायचे. या मजूरीतन ना त्याचे घर चालायचे ना लोनचे हफ्ते चुकते व्हायचे. त्यामुळे तो फारच खचला होता. यातूनत त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.
हे ही वाचा : Crime : दुहेरी हत्याकांडाने नगर हादरलं! मायलेकाला कारने चिरडून संपवलं, शेजाऱ्याने हत्या का केली?
जयपूरमध्ये घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने आता शहर हादरले आहे.पोलिसांनी या प्रकणात आता आरोपीचा शोध सूरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT