Kanpur: दररोज यायची घरी… ट्यूशन टीचरने विद्यार्थ्यालाच कसं संपवलं? Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

kanpur kushagra murder case tution teacher along with boyfriend kiled 10th student shocking crime story
kanpur kushagra murder case tution teacher along with boyfriend kiled 10th student shocking crime story
social share
google news

Kanpur Kushagra Murder Case : आई-वडिलांनंतर शिक्षकच एक असे असतात जे मुलांच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी करतात. म्हणूनच त्यांना गुरूंचा दर्जा दिला जातो. मात्र या घटनेत गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका ट्युशन टीचरने (Tution Teacher) विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्या विद्यार्थ्याला प्ले ग्रुपपासून तब्बल सात वर्ष शिक्षणाचे धडे दिले, त्याचं विद्यार्थ्याची ट्युशन टीचरने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या कानपूर (Kanpur) हादरलं आहे. दरम्यान या ट्युशन टीचरने विद्यार्थ्यांची हत्या का केली? या हत्येमागचं कारण काय? हे जाणून घेऊयात. (kanpur kushagra murder case tution teacher along with boyfriend kiled 10th student shocking crime story)

ADVERTISEMENT

कानपूरमध्ये (Kanpur) दहावीत शिकणाऱ्या कुशाग्रची (वय15) ची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. कुशाग्रची हत्या त्याचीच ट्युशन टीचर रचिताने केल्याचे आता उघड झाले आहे. या घटनेत रचिताला तिचा बॉयफ्रेंड प्रभात आणि एका मित्राने साथ दिली होती. ट्युशन टीचर रचिनाने सोमवारी कुशाग्रला तिच्या घरी बोलावलं होतं. कुशाग्र घरी आल्यानंतर रचिताने त्याला स्टोर रूममध्ये नेले. त्यानंतर रचिता, प्रभात आणि त्याच्या मित्राने मिळून स्टोररूममध्ये कुशाग्रची हत्या केली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation : “मी त्याला फाडून खाईन”, आमदार गायकवाडांचं धक्कादायक विधान

या हत्येनंतर रचिताचा बॉयफ्रेंड प्रभात आणि त्यांचा मित्र एक पत्र घेऊन कुशाग्रच्या इमारतीत जातात. विशेष म्हणजे जाताना हे दोघेही आरोपी रचिताची स्कुटी वापरतात. कुशाग्रच्या इमारतीजवळ पोहोचल्यावर दोघेही वॉचमनला बोलावून त्याच्या हातात एक पत्र देतात, हे पत्र कुशाग्रच्या कुटुंबियांना देण्यास सांगतात आणि पळ काढतात. या पत्रात कुटुबियांकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आलेली असते. विशेष म्हणजे कुशाग्रची हत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुबियांना खंडणीसाठी हे पत्र दिले जाते. या मागचा आरोपींचा इतका उद्देश असतो की, पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावू नये आणि पोलिसांचा तपास भरकटावा. मात्र आरोपींची हीच चुक त्यांना महागात पडली.

हे वाचलं का?

स्कूटीने झाला घटनेचा उलगडा

ट्युशन टीचर रचिता साधारण प्ले ग्रुपपासुन कुशाग्रची शिकवणी घेत होती. त्यानंतर ज्यावेळेस तिने कुशाग्रची शिकवणी बंद केली, त्यानंतर तिने त्याच्या छोट्या भावाची शिकवणी सुरू केली होती. मोठ्या व्यावसायिकांच्या मुलांची शिकवणी घेत असल्याने तिला चांगली फिस मिळत होती. त्यामुळे याच पैशातून तिने नवी कोरी स्कुटी खरेदी केली होती. याच स्कुटीने आता तिला जेलची हवा खायला लावली आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘मुंबई सोडू नका, आरक्षण…’, जरांगे पाटलांनी आमदारांना केली विनंती

कारण कुशाग्रची हत्या केल्यानंतर प्रभात आणि त्याचा मित्र खंडणीच पत्र घेऊन त्याच्या घरी गेला होता. त्यावेळेस त्याने रचिताच्या याच स्कुटीचा वापर केला होता. हीच स्कुटी खरं तर इमारतीच्या वॉचमनची ओळखीची झाली होती. कारण नेहमी याच स्कुटीने रचिता कुशाग्रच्या घरी शिकवणीसाठी यायची. तसेच दोन तरूणांची संशयास्पद कृती आणि पत्र पाहून वॉचमनने देखील बहादुरी दाखवून स्कुटीचा नंबर लिहून घेतला. आणि याच पुराव्याच्या आधारावर कुशाग्रच्या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांनी मोठी मदत मिळाली.

ADVERTISEMENT

रचिता इतकी शातिर होती की हत्येनंतर दररोज कुशाग्रच्या मामांना फोन लावायची. कुशाग्रबाबत दु:ख व्यक्त करायची आणि मांमाकडून पोलिसांची संपूर्ण हालचाल समजून घ्यायची. पण ज्यावेळेस वॉचमनने कुशाग्रच्या मामांना स्कुटीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी रचिताला स्कुटीबद्दल विचारणा केली. तुझी स्कुटी कुठे आहे? यावर रचिता म्हणाली. माझ्या मित्राजवळ आहे. तुझा मित्र कुठे आहे? अशी विचारणा करताच रचिता घाबरली आणि इथेच कुटुंबियांना रचितावर संशय बळावला. पोलिसांनी या प्रकरणी रचिताला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता तिने घटनेचा उलगडा केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT