आधी बोलायचा ताई, नंतर बनली गर्लफ्रेंड; तुकडे-तुकडे केले अन्… अंगावर काटा आणणारी कहाणी
Kerala Suchitra Pillai Murder Case: केरळच्या पलक्कड जिल्ह्यात एका संगीत शिक्षकाने त्याच्या मैत्रिणीची हत्या केली होती. हे प्रकरण उजेडात आणण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन वर्षे लागली.
ADVERTISEMENT
Kerala Suchitra Pillai Murder Case: पलक्कड (केरळ): केरळच्या पलक्कड जिल्ह्यात एका संगीत शिक्षकाने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना तब्बल दोन वर्षे लागली. ही बाब 2020 सालची आहे. त्यावेळी संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे थैमान घातलं होतं, पण 33 वर्षीय प्रशांत नांबियारने (Prashant Nambiar)याच वेळी त्याची गर्लफ्रेंड सुचित्रा पिल्लई (Suchitra Pillai Murder) हिची हत्या केली होती. त्याने आपल्या मैत्रिणीची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. तसेच याप्रकरणी सर्व पुरावे देखील नष्ट केले होते. आता पोलिसांनी गुगल सर्च हिस्ट्रीच्या (google search history) मदतीने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. (kerala suchitra pillai murder case boyfriend prashant nambiar google search history revealed the murder secrets)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
प्रेयसीला मारण्याआधी प्रशांतने गुगलवर सर्च केलं होतं की, एका अध्यात्मिक गुरूने त्याच्या पत्नीची हत्या कशी केली होती How did the spiritual guru kill his wife?) यानंतर त्याने सुचित्राला मारण्याचा कट रचला. प्रेयसीला मारण्यासाठी प्रशांतने असा काही कट रचला होता की, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. प्रशांतने गुगलवर हत्येसंबंधी काही गोष्टी सर्च केल्या आणि त्यानंतरच त्याने सुचित्राची हत्या केली. तसंच हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाटही लावली. त्यामुळेच सुरुवातीला त्याला पोलिसांना पकडता आलं नाही. त्याने तशा पद्धतीनेच हा गुन्हा केला होता. त्यासाठी त्याने काही हत्येसंबंधीचे चित्रपटही पाहिले होते.
हे ही वाचा >> बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!
खरं तर प्रशांत आणि सुचित्रा यांच्यातील नातेसंबंधांना अतिशय विचित्र पद्धतीने सुरुवात झाली होती. कारण सुरुवातीला प्रशांत हा सुचित्राला दिदी म्हणून हाक मारायचा. पण तीच सुचित्रा त्याची गर्लफ्रेंड कशी झाली हे त्याला देखील कळलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. मात्र, 2020 साली प्रशांतने अतिशय निर्घृणपणे सुचित्राची हत्या केली. एवढंच नव्हे तर तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून त्याची विल्हेवाट देखील त्याने लावली.
हे ही वाचा >> शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर सलग 2 महिने बलात्कार, तब्बल 9 वर्षांनंतर अटक!
याच प्रकरणी कोल्लमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी प्रशांतला नाडूविलक्करा गावातील रहिवासी सुचित्रा हिच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रशांतला 14 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्याला 2.5 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. या दोन्ही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगाव्या लागणार आहे. 2019 मध्ये या दोघांच्या नातेसंबंधाला सुरुवात झाली होती.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT