आधी छातीत नंतर डोक्यात घातली गोळी, लिव्ह-इन पार्टनरला का संपवलं?
लिव्ह-इन पार्टनरची हत्या : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे लिव्ह-इन पार्टनरची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. हत्येनंतर तरुण पोलिसांसमोर हजर झाला.
ADVERTISEMENT
live in partner killed in lucknow : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरात एका तरुणीवर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने गोळ्या झाडल्या. यात तरुणीचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, मुलीचा घटस्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेक महिन्यांपासून ती आरोपींसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, रिया नावाची घटस्फोटित मुलगी पॅराडाईज क्रिस्टल अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहत होती. तिच्यावर ऋषभ नावाच्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऋषभ सिंह भदौरिया हा लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पॅराडाईज अपार्टमेंटच्या सी ब्लॉकमध्ये रिया गुप्ता नावाच्या मुलीसोबत राहत होता. रिया ही गोमतीनगर येथील रहिवासी होती.
घटनेपूर्वी दोघांमध्ये झाला होता वाद
घटनेपूर्वी रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडण विकोपाला गेला आणि रागाच्या भरात ऋषभने रियाला गोळ्या घातल्या. त्यातच तिचा मृत्यू झाला. कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या ऋषभने गुन्हा केल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
वाचा >> Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…
घटनेचे कारण काय?
हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीने मुलीच्या छातीत आणि डोक्यात गोळी झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमागचे कारण काय, याचा तपास सुरू आहे.
वाचा >> Sana Khan Murder: एक नदी, विहीर अन्.. भाजपच्या सना खानच्या हत्येची चक्रावून टाकणारी कहाणी!
या घटनेबाबत एडीसीपी काय म्हणाले?
एडीसीपी शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ सिंह भदौरिया याने मुलीवर गोळी झाडली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. पुढील माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT