Crime: 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला, जागीच गेला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

live in relationship lover cut the private part of the partner living rajasthan police case
live in relationship lover cut the private part of the partner living rajasthan police case
social share
google news

Live-in-Relationship Murder Crime: बारमेर (राजस्थान) राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. आपल्या लहान भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship ) राहणाऱ्या व्यक्तीची त्याच्या भावजयीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हत्या ज्या प्रकारे करण्यात आली त्याने एकच खळबळ माजली आहे. दिराच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part) अत्यंत जोरात दाबून खेचल्याने 50 वर्षीय मालाराम जोगी याची हत्या (Murder) करण्यात आली. (live in relationship lover cut the private part of the partner living rajasthan police case)

ADVERTISEMENT

आरोपी महिला ही 12 मुलांची आई असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. आरोपी महिला आणि मालाराम हे मागील काही वर्षांपासून लिव्ह-इन मध्येच राहत होते. या दोघांची चार मुलंही आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या दोघांमध्ये बराच वाद झाला. त्यावेळी मालारामने आपल्या वहिनीवर हात उगारला. त्यावेळी महिलेने रागाच्या भरात मालाराम याचा प्रायव्हेट पार्ट अत्यंत जोराने दाबून खेचला. ज्यामुळे मालाराम हा जागीच कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टला अंतर्गत गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.

महिलेने प्रायव्हेट पार्टवर का चढवला हल्ला

पोलिसांनी सांगितले की, मालाराम जोगी हा गेल्या तीन वर्षापासून आपल्या लहान भावाची पत्नी पावनी हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. राजस्थानच्या बारमेर शहराजवळील शिवनगर येथील दादी परिसरात मालाराम याचा मृतदेह आढळून आला.

हे वाचलं का?

शुक्रवारी रात्री आपल्या भावाची पत्नी म्हणजेच त्यांची पावनी आणि मालाराम यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी मालारामने तिच्यावर हात उचलला होता. मारहाण केली होती. त्यावेळी पावनीने रागाच्या भरात मालारामच्या प्रायव्हेट पार्टच अत्यंत जोरात दाबून खेचला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला शेजारच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune Crime: हत्या की आत्महत्या? मायलेकीचे मृतदेह आढळले धक्कादायक अवस्थेत!

दीर आणि भावजयचा वाद

या प्रकरणी पोलिसांनी मालारामचा मृतदेह पुढील तपासासाठी शवागरात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधील दीर आणि भावजय यांच्यातील वाद कशामुळे टोकाला गेला होता. त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ADVERTISEMENT

प्रायव्हेट पार्ट दाबताच बेशुद्ध झाला

भावजय आणि दीर ही दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यावेळी तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला असल्याचे तपासात उघड झाले आहे.

हे ही वाचा >> Gaganyaan : इस्रोने रचला इतिहास, गगनयानच्या क्रू मॉड्यूलची यशस्वी चाचणी!

दोघांना चार मुलं

मालारामच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यानंतर तो लहान भावाच्या पत्नीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांना चार मुलं झाली होती. गेल्या काही वर्षांपासून ही दोघं पती-पत्नीसारखीच राहत होती. पण अचानक दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मालाराम याला त्याचा जीव गमवावा लागला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT