नवरा जेलमध्ये गेला! पत्नीने शेजारच्या तरुणासोबत ठेवले अनैतिक संबंध, दिराला समजताच झाला मोठा कांड

मुंबई तक

Extra Marital Affaire Viral News :  कोटामध्ये एका तरुणाला वहिनीच्या विवाहबाह्य संबंधात दखल देणं महागात पडलं. त्या महिलेच्या दिराला जीव गमवावा लागला.

ADVERTISEMENT

Extra Marital Affair Viral Story
Extra Marital Affair Viral Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा जेलमध्ये जाताच बायकोने दुसऱ्या तरुणासोबत केला अफेयर

point

वहिनीच्या प्रियकराने दिराचा केला खून

point

नेमकं घडलं तरी काय?

Extra Marital Affaire Viral News :  कोटामध्ये एका तरुणाला वहिनीच्या विवाहबाह्य संबंधात दखल देणं महागात पडलं. त्या महिलेच्या दिराला जीव गमवावा लागला. या घटनेबाबत पोलिसांना कळताच धक्कादायक माहिती समोर आली. पती जेलमध्ये गेल्यावर पत्नीच्या प्रेमसंबंधात तिच्या दिराने एन्ट्री मारली. त्यानंतर त्या महिलेच्या प्रियकराला समजलं अन् मोठा कांड घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, भंवरलाल भील उर्फ भोला या रक्तबंबाळ झालेला मृतदेह कोटाच्या डोलिया गावात अज्ञात स्थळी सापडला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास लावताच खळबळजनक माहिती समोर आली. रानपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामविलास यांनी सांगितलं की, महिलाचे तिच्या शेजारी राहणाऱ्या हेमराज भीलसोबत अनैतिक संबंध होते. हेमराजवर आरोप आहे की, त्याने त्याचा साथीदार बबलू भीलच्या मदतीने भंवरलालची हत्या केली.

हे ही वाचा >> अज्ञात व्यक्तीने धावत्या एक्स्प्रेसमध्ये फेकला दगड! आजीसोबत प्रवास करणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

भवरलालला काही दिवसांपूर्वीच त्याची वहिनी आणि हेमराजच्या संबंधांबाबत खबर लागली होती. अशाप्रकारचं कृत्य करू नका, असं त्याने दोघांनाही समजावलं होतं. भंवरलालने गुरुवारी हेमराजला पाहिलं आणि त्याला पुन्हा वहिनीपासून दूर राहायची समज दिली. त्यानंतर दोघांमध्ये मारहाण झाली. हेमराजने बबलूच्या मदतीने भंवरलालला दगडाने ठेचून मारलं. त्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. भंवरलालच्या काकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हेमराज आणि बबलू विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा >> Today Gold Rate : अहो राव, काय ते सोन्याचे भाव! सोनं पुन्हा कडाडलं, आजचे दर वाचून सर्वांनाच बसलाय धक्का

हेमराजला अटक..इतरांचा शोध सुरू

पोलिसांनी आरोपी हेमराजला अटक केली आहे. दुसरा आरोपी बबलूचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भंवरलाल गुरुवारी त्याचा साथीदार कंवरलालसोबत सकाळी 10 वाजताच्या सुमारास घराबाहेर निघाला होता. त्यानंतर शेतात त्यांच्यात वाद झाला. भंवरलालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp