मौलाना रहीमुल्ला तारिकची पाकिस्तानात हत्या, ‘जैश’च्या दहशतवाद्याबरोबर होते जवळचे संबंध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maulana Rahimullah Tariq close associate Jaish chief Masood Azhar was shot dead assailants in Karachi
Maulana Rahimullah Tariq close associate Jaish chief Masood Azhar was shot dead assailants in Karachi
social share
google news

Pakistan News: पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या जवळील व्यक्तींना आता टार्गेट करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या संघटनेच्या अनेक लोकांवर हल्ला (Attack) करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये मौलाना रहिमुल्ला तारिक (Maulana Rahimullah Tariq) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कराचीमधील काही वृत्तसंस्थांनी या घटनेचे वृत्त दिले आहे. मौलाना रहीमुल्ला हा जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) चा प्रमुख मसूद अझहरचा जवळचा असल्याचे सांगितले जात आहे. मौलाना तारिक अनेकदा भारताच्या विरोधात त्याने गरळ ओकली आहे.

ADVERTISEMENT

टार्गेट किलिंग

कराचीमध्ये ओरंगी टाऊनमध्ये भारताविरोधी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मौलाना रहीमुल्ला सामील होणार होते. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मौलाना रहीमुल्ला तारिक हे एका धार्मिक सभेला जात होते. त्यावेली अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना टार्गेट किलिंगची असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >> कार रिपेअर करायला गेले अन्… 6 जणांचा जीवच गेला, असं घडलं तरी काय?

भारताविरोधात गरळ

पाकिस्तानामध्ये भारताविरोधात रॅली काढण्याचे कार्यक्रम चालू असतानाच हा प्रकार घडल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. सध्याच्या काळात भारताविरोधात कारवाय करणाऱ्या दहशतवाद्यांना अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अक्रम हा भारताविरुद्ध नेहमीच गरळ ओकत होता. त्याने 2018 ते 2020 या काळात लष्करातील भरतीचेही काम पाहिले होते. लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी अक्रम हा एक आहे. तो दीर्घ काळदहशतवादी कारवायांमध्येही सामील झाला होता.

हे वाचलं का?

मोस्ट वाँटेड दहशतवादी

पाकिस्तानमध्ये सध्या सातत्याने होत असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येमुळे अनेक दहशतवाद्यांची झोप उडाली आहे. गेल्या महिन्यात भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ हा ही पाकिस्तानमध्ये ठार झाला होता. मात्र लतीफची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. लतीफ हा 2016 मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. एअरफोर्स स्टेशनवर हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना तो पाकिस्तानमधून सूचना देत होता असंही यावेळी सांगण्यात आले आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच 6 मे रोजी खलिस्तान कमांडो फोर्सचे प्रमुख परमजीत सिंग पंजवाड यांची पाकिस्तानातील लाहोरमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दहशतवाद्यांची दिवसढवळ्या हत्या करण्यात आल्याने अनेकांनी याचा धसका घेतला होता.

हे ही वाचा >> प्रेयसी बनली डीपफेकची शिकार, नकार मिळताच प्रियकराने नग्न फोटोच…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT