इंस्टाग्रामवरच्या मैत्रीने केला घात, अल्पवयीन मुलीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार
Kalyan Crime: इंस्टाग्रामवर मैत्री करणं हे एका अल्पवयीन मुलीला बरंच महागात पडलं आहे. ऑनलाइन मैत्री केलेल्या तरुणाने अल्पवीयन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
Kalyan Crime News: कल्याण: कल्याणमध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या अनुषंगाने कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. (minor girl cheated by instagram friend gang raped by four in Kalyan)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
कल्याणमध्ये राहणारी 15 वर्षीय पीडित मुलीची सुरुवातीला आरोपीशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून बातचीत सुरु झाली. काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणाने माझे प्रेयसीसोबत भांडण झाले आहे त्यामुळे मी खूप निराश आहे. असे सांगून पीडित मुलीला भेटण्यास बोलावलं. जेव्हा मुलगी आरोपी तरुणाला भेटण्यासाठी गेली तेव्हा त्याने तिला एका रूमवर नेलं.
यावेळी तरुणाने अतिप्रसंग करत मुलीवर बलात्कार केला. तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुसऱ्या दिवशीही बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला. पण यावेळी त्याने आपल्या तीन मित्रांनाही येथे बोलावलं होतं. त्यामुळे या तिघांनीही मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान, मुलगी बराच वेळ घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती हरवली असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
हे ही वाचा>> नवरा अचानक घरी आला, बायको 15 वर्षाच्या मुलासोबत होती ‘त्या’ अवस्थेत…
ज्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरू केल आणि पीडित तरुणीची सुटका केली. तसेच कोळसेवाडी पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे देखील समोर आले.
याच प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले. ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. तर आरोपी साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी तर आरोपींची नावे असून यातील एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे हे करत आहेत.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लॉजवर लैंगिक अत्याचार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच घटना साताऱ्यात देखील घडली होती. इयत्ता नववीत शिकण्यास असलेल्या मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेत नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. हळूहळू ही ओळख वाढत गेली आणि सोशल मीडियावर दोघे एकमेकांशी सातत्याने संपर्क साधत गेले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?
दोघातील संवाद वाढत गेल्याने संकेत मेंगणे हा वारंवार साताऱ्यात येऊ लागला. त्याचवेळी संकेत हा अल्पवयीन तरुणीला वारंवार भेटत होता. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान संकेतने मुलीसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले होते. पण काही दिवसांनी आपल्याकडील हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी संकनेत अल्पवयीन मुलीला देण्यास सुरुवात केली. याच गोष्टीची भीती दाखवून संकेतने मुलीकडे शरीरसुखाची मागणी देखील केली.
त्यानंतर संकेत मेंगणेने अल्पवयीन मुलीला साताऱ्यातील एका लॉजमध्ये नेलं तसेच एका कॅफेत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडित मुलीने याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यानंतर आरोपी संकेत मेंगणे याला तात्काळ अटक करण्यात आली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT