किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mira road live in partner murder cooker manoj sane saraswati vaidya police fir as it is geeta aakashdeep building
mira road live in partner murder cooker manoj sane saraswati vaidya police fir as it is geeta aakashdeep building
social share
google news

CRIME NEWS: मुंबई: मीरा रोड येथील लिव्ह-इन पार्टनरची हत्या (Mira Road Live in Partner Murder) प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या महिलेसोबत 10 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला त्याच महिलेचा 56 वर्षीय पार्टनरने हत्या करून तिचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी मनोज साने (Manoj Sane) याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, जेव्हा स्वत: पोलीस घटनास्थळी पोहचले होते तेव्हा त्यांची देखील आतील दृश्य पाहून भंबेरी उडाली होती. याबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार (Police FIR) बरीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. (mira road live in partner murder cooker manoj sane saraswati vaidya police fir as it is geeta aakashdeep building)

ADVERTISEMENT

मीरारोड हत्या प्रकरणातील FIR जसाच्या तसा..

दिनांक 07/06/2023 फिर्याद मी पोलीस उपनिरीक्षक राहुल बाळासाहेब भागतव (वय 35 वर्षे) नोकरी, नयानगर पोलीस ठाणे. सरकारतर्फे फिर्याद लिहून देतो की, मी नयानगर पोलीस ठाणे येथे एप्रिल 2022 पासून नेमणुकीस आहे. आज दिनांक 07/04/2023 रोजी सकाळी 08.00 ते 20.00 वा. पावेतो मला पोलीस ठाणे अंमलदार कर्तव्य नेमण्यात आलेले असल्याने मी सकाळी 08.00 वा. पासून कर्तव्यावर हजर आहे. सुमारे 19.00 वा. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. नयानगर यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे व प्रशा) जिलानी सय्यद यांना कळविले की, गितानगर फेज 7 मधील गिता आकाशदिप जे विंग 7 व्या माळयावरील फ्लॅट नं. 704 मधून दुर्गंधी येत आहे, तरी तुम्ही जाऊन काय प्रकार आहे ते पाहा.

त्यावरुन आम्ही सोबत पो.नि. जिलानी सय्यद असे आमचे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी पोहचलो. तेथे गिता आकाशदिप बिल्डींग जे विंगबाबत वॉचमन यांना विचारपूस करुन 7 व्या माळयावर पोहचलो. फ्लॅट क्र. 704 मधून दुर्गंधी येत असल्याबाबत समोरच राहणारे फ्लॅट क्र. 701 मधील रहिवासी महिला नामे श्रीम. निरज श्रीवास्तव हिने सांगितले.

हे वाचलं का?

तिच्याकडून अधिक माहिती घेतली असता तिने सांगितले की, ‘दुपारी माझा मुलगा जेवण करण्याकरिता आला होता. तो जात असतांना त्याने सांगितले की, दुर्गंधी येत आहे. त्याने फ्लॅट क्र. 704 च्या दरवाजाला मागे लोटून नाक लावून वास घेतला व याच फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची खात्री केली. तसेच दरवाजा वाजविला असता कोणीही दरवाजा उघडला नाही.’

हे ही वाचा >> Mira Road : ‘या’ माणसामुळे मनोज सानेने केलेल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाचं बिंग फुटलं

सुमारे संध्याकाळी 4.30 वा. सदर फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती नामे मनोज साने यास तिचा मुलगा सोमेश श्रीवास्तव भेटला त्यावेळी त्याने सदर इसमास तक्रार केली. तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत होता.. व मी पाहून घेतो, कशाचा वास येतो. मी बाहेर चाललो आहे. मी पुन्हा रात्री 10.30 वा. नंतर येणार असल्याचे सांगून निघून गेला.

ADVERTISEMENT

त्यावेळी त्याच्या पाठीवर एक काळया रंगाची सॅक होती… वगैरे माहिती दिली. अधिक माहिती घेतली असता सदर ठिकाणी इसम नामे मनोज साने हा एका तरुण महिलेसोबत राहत असल्याचे समजले. वरीलप्रमाणे माहिती प्राप्त झाल्याने आम्हास काहीतरी अघटीत झाल्याचा संशय आल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती मा. वरिष्ठांना दिली व उपस्थित इसम नामे 1. सोमेश श्रीवास्तव, 2. गणेश बालाजी तेलगी आणि 3. वैभव सुभाष तेलगी यांची मदत मिळवून सदरच्या फ्लॅटचे कुलूप उघडून आत प्रवेश केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mira Road Murder : हत्याकांड घडलेला ‘तो’ फ्लॅट आमदार गीता जैन यांच्या पतीचा

आतमध्ये दुर्गंधी येत असल्याने आम्ही सर्वांनी प्रथम हॉल, बाथरुम, संडास व दोन्ही बेडमध्ये प्रवेश करुन पाहिले. त्यातील एका बेडमध्ये काळया रंगाचे प्लॅस्टिक व एक इलेक्ट्रीकल मशीन रक्त लागलेली दिसून आली. नंतर जास्त वास येण्याचे ठिकाण किचनमध्ये प्रवेश केला. तेव्हा सदर ठिकाणी फरशीवर डोक्यापासून कापलेले वेणी (महिलेचे केस वेणी घातलेले असे) दिसून आली. तसेच किचन ओटयावर गॅस शेगडी व त्यावर कुकर त्यामध्ये मानवी मांस शिजविलेले, पातेल्यामध्ये मानवी मांस शिजविलेले वॉश बेसिनमध्ये बादलीत हाडे अर्धवट जळालेले. मानवी मांस हिरवी, काळी बादली व टबमध्ये ठेवलेले दिसून आले.

तरी इसम नामे मनोज साने याने त्याच्यासोबत राहत असलेल्या महिलेस कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी तिचे तुकडे करुन तिला जीवे ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याचे हेतूने तिच्या शरीराचे यांत्रिक करवत ( इलेट्रीकल मशीन) ने तुकडे-तुकडे करुन कुकरमध्ये व पातेल्यामध्ये शिजविले व काही तुकडे भाजुन बादली, टबमध्ये ठेवले. म्हणून माझी इसम नामे मनोज साने याच्या विरुध्द भा. द.वी. क. 302 201 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT