आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाबाबत ठाकरे गटाने केली मोठी मागणी, थेट…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज सुर्वेसह 10 ते 12 जणांवर हा गुन्हा दाखल आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज सुर्वेसह 10 ते 12 जणांवर हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक झाली आहे, तर राज सुर्वेसह त्याचे इतर साथिदार फरार आहेत. या प्रकरणात आता ठाकरे गटाने उडी घेतली आहे.ठाकरे गटाच्या माजी आमदार विलास पोतनीस आणि विनोद घोसाळकर यांनी अतिरीक्त पोलीस आयुक्त जैन यांची भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे गटाच्या माजी आमदारांनी आमदार पुत्राला शोधून काढत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाच्या या मागणीमुळे आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे माजी आमदार विलास पोतनीस,माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी आज अतिरीक्त पोलीस आयुक्त जैन यांची भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरेंच्या माजी आमदारांनी म्युझिक कंपनीच्या सीईओचे अपहरण प्रकरणात फरार राज सुर्वेसह त्याच्या साथिदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये अतिरीक्त पोलीस आयुक्त जैन यांनी देखील माजी आमदारांना कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता आमदार प्रकाश सु्र्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माजी आमदारांचे म्हणणे काय?
शिंदे सेना सत्तेचा गैरवापर करते आहे.इतर पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत, मात्र यांच्या नेत्यांना अभय मिळते आहे. पोलिसांवरही दबाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Pune: ‘आम्ही देवालाही सोडत नाही..’, पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवारांची जोरदार फिल्डिंग?
प्रकाश सुर्वे खोट बोलतायत, यांचे उद्योगधंदेच ते आहेत. शिकलेला मुलगा वडिलांमुळेच वाया गेलाय. यांची दादागिरी सूरू आहे, याचा एक टॉर्चर रूम आहे, असे माजी आमदार विलास पोतनीस म्हणाले आहेत. तसेच अतिरीक्त पोलीस आयुक्त जैन यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. या मागणीवर त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे पोतनीस यांनी सांगितले आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज प्रकाश सुर्वे याच्याविरुद्ध राजकुमार जगदीश सिंग (वय 38) यांनी तक्रार दिली आहे. ते ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा.लि. या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची कंपनी डिजिटल लॅटरल ठेवून कर्जही देते.
ADVERTISEMENT
तक्रारीत म्हटलं आहे की, मनोज मिश्रा यांची आदिशक्ती प्रा.लि. म्युझिक कंपनी आहे. त्यांना राजकुमार सिंग हे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतात. मनोज मिश्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कंपनीचे लायसन्स गहाण ठेवून कर्ज दिले. तसे एका वर्षासाठी करारही झाला होता.
ADVERTISEMENT
मनोज मिश्राने 2021 मध्ये ग्लोबल म्युझिक कंपनीकडून 8 कोटींचं कर्ज घेतले. झालेल्या कराराप्रमाणे त्यांच्याकडून 11 कोटी रुपये मिळणार होते. हे करारपत्र 2026 पर्यंत होते. मात्र, मनोज मिश्राने दिलेल्या पैशाचा वापर इतर गोष्टींसाठी केला आणि त्याच्या परिणाम नफ्यावर झाला, असे तक्रारीत म्हटलं आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar: ‘खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून..’, CM पदावरुन अजितदादांची तुफान बॅटिंग
सिंग यांनी मिश्रांना कंटेट बनवण्यास सांगितले. त्यावर मिश्रांनी आणखी पैसे मागितले. त्याला पैसे सिंग यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याने करार रद्द करण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. पण, सिंग यांनी त्याला सेटलमेंट करूयात असे सांगितले.
राजकुमार सिंग यांचे अपहरण आणि…
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे बुधवारी (9 ऑगस्ट) 3.15 वाजता एका व्यक्तीने सिंग यांना कॉल केला. कॉल केलेल्या व्यक्तीने सिंग यांना भेटायला बोलावले, पण सिंग यांनी शनिवारी येतो असे सांगितले. त्यानंतर सिंग यांच्या कार्यालयात 10-15 जण घुसले.
10-15 जणांनी राजकुमार सिंग यांना मारहाण केली. त्यानंतर ऑफिसमधून जबरदस्ती घेऊन गेले. त्यानंतर हे लोक सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्वमधील कार्यालयात घेऊन गेले. तिथे राज सुर्वे बसलेला होता. मनोज मिश्राही तिथे होता. तिथेच राज सुर्वे आणि मनोज मिश्राने राजकुमार सिंग यांच्याकडून करार रद्द झाल्याचे लिहून घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि इतर 10-12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT