मोबाइल गेममधून सुरु होतं मुलांचं धर्मांतर, काय आहे मुंब्रा कनेक्शन?
गाझियाबाद पोलिसांनी मोबाइल गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्याप्रकरणी आता मुंब्रा कनेक्शन देखील समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
News in Maharashtra: विक्रांत चौहान, ठाणे: ऑनलाइन गेमद्वारे (Online Game) धर्मांतर (conversion) होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी नोटीसही बजावली आहे. गाझियाबाद पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ एक पथक तयार करून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. याच प्रकरणात आता मुंबईनजीक असणारं मुंब्रा कनेक्शन देखील समोर आलं आहे. (mobile game minor boys conversion mumbra connection ghaziabad crime news in maharashtra)
ADVERTISEMENT
गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, मुंबईनजीक असलेल्या मुंब्रा (Mumbra) भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून ऑनलाइन गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. त्यानंतर ऑनलाइन गेमची चटक लावून तो अतिशय चालाखीने मुलांचे धर्मांतर देखील करत होता. याबाबत आता बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना शाहनवाज हा कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार असल्याचे अमिष देखील दाखवत होता.
मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. गाझियाबाद पोलीस शाहनवाज मकसूद खानच्या शोध घेत असून त्याला अटक करण्यासाठी काही दिवसांपासून मुंब्रा येथील देवरी पाडा येथे आले. मात्र, शाहनवाज मकसूद खान हा आपल्या कुटुंबासह कुठेतरी फरार झाला आहे. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. शाहनवाज हा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय करतो. गेल्या आठवड्यापासून त्याच्या घराला कुलूप आहे. सध्या पोलीस शाहनवाजचा कसून शोध घेत आहेत.
समजून घ्या संपूर्ण प्रकरण…
गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबातील अल्पवयीन मुलगा पाच वेळा घराबाहेर पडू लागला. सुरुवातीला घरच्यांनी याकडे लक्ष दिले नाही. पण, जेव्हा त्या लोकांनी मुलाला बाहेर जाण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने घरच्यांना जिमला जाण्याचे सांगितले. नंतर समजले की, अल्पवयीन मुलगा हा जिमच्या नावाने नमाज अदा करण्यासाठी जातो. हे सत्य जाणून कुटुंबीयांना धक्काच बसला. याप्रकरणी त्यांनी कवीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी सायबर टीमची मदत घेत एका तरुणाला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी केलेला खुलासा अतिशय धक्कादायक असा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> चॉकलेट समजून सापालाच खाल्लं, नंतर 3 वर्षाच्या चिमुकल्याला…
प्रत्यक्षात धर्मांतराची तक्रार समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना गाझियाबादच्या सेक्टर 23 येथील जामा मशीद येथील 15 सदस्यीय समितीचा सदस्य अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली. तो महाराष्ट्रातील रहिवासी शाहनवाज मकसूद याच्यासोबत अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करायचा असे समोर आले.
ADVERTISEMENT
यासोबतच हे लोक अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉश करण्यासाठी भारतातील प्रतिबंधित इस्लामिक भाषक डॉ. झाकीर नाईक आणि तारिक जमील यांचे व्हिडिओ दाखवत होते, अशीही माहिती मिळाली आहे. आरोपी अब्दुल रहमान उर्फ नन्नी. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपींना पकडण्यासाठी गाझियाबाद पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे.
गेम जिंकण्यासाठी कुराण पठण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना फसवून धर्मांतराचा हा खेळ केला जात होता. धर्मांतर करण्यासाठी, अल्पवयीन मुलांना फोर्ट नाईट गेम अॅपवर ऑनलाइन गेम दिले गेले. खेळ खेळणाऱ्यांमध्ये काही बनावट लोक असायचे, ज्यांचे आयडी हिंदू नावाचे होते.
हे ही वाचा >> Uttar Pradesh : हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!
गेम जिंकण्यासाठी हे लोक अल्पवयीन मुलांना सांगत असत की, जर त्यांना जिंकायचे असेल तर कुराणचे आयत वाचावेत. ज्या अल्पवयीन मुलांवर त्यांच्या शब्दांचा प्रभाव पडतो, हे लोक त्यांना हळूहळू आयत वाचायला शिकवतात, कुराण आणि इस्लामवर विश्वास ठेवतात. आत्मविश्वास देण्यासाठी अल्पवयीन मुलांना खेळ देखील जिंकवला जायचा.
एकदा अल्पवयीन मुलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली की, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात diccord अॅपवर अल्पवयीन मुलांशी वैयक्तिक चॅटिंग करण्या यायचं. मुलं पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर त्यांना इस्लामिक विधींची माहिती देण्यात यायची.
झाकीर नाईक आणि तारिक जमील यांचे व्हिडिओ
जेव्हा अल्पवयीन मुले पूर्णपणे या लोकांच्या ताब्यात यायचे, तेव्हा त्यानंतर बंदी घातलेल्या इस्लामिक भाषक डॉ. झाकीर नाईक आणि तारिक जमीलचे व्हिडिओ त्यांना दाखवले गेले, जेणेकरून त्यांचा इस्लामकडे अधिक कल वाढेल आणि मग हे लोक इस्लाम धर्म स्वीकारतील. जेव्हा अल्पवयीन मुलांनी इस्लाम धर्म स्वीकारायचे तेव्हा हे लोक त्यांचे प्रतिज्ञापत्र बनवून घेत असत.
एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सिटी झोन निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक करण्यात आली असून बद्दो नावाच्या बनावट आयडीद्वारे धर्मांतर करणाऱ्या मोहम्मद शाहनवाज मकसूदला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचे पथक महाराष्ट्रातील ठाण्यात पाठवण्यात आले आहे.
चार अल्पवयीन मुलांचे धर्मांतर
या टोळीने गाझियाबादमधील दोन, चंदीगडमधील एक आणि हरियाणातील एकाचे धर्मांतर केले आहे. आरोपीच्या इतर साथीदारांचा आम्ही शोध घेत आहोत. गाझियाबादच्या संजय नगरमध्ये उपस्थित असलेल्या जामा मशिदीच्या समितीतील इतर सदस्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या अब्दुल रहमान उर्फ नन्नी आणि बद्दो उर्फ शाहनवाज मकसूद या दोघांचे संबंध धर्मांतरित झालेल्या तरुणांशी असल्याने पोलीस या दोघांचे संबंधही तपासत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT