Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

भागवत हिरेकर

पुण्यातील हडपसर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपीने महिलेच्या पतीसमोरच हे कृत्य केले.

ADVERTISEMENT

Pune Crime : A moneylender rapes the wife of a loanee. Hadapsar police arrested him in this case.
Pune Crime : A moneylender rapes the wife of a loanee. Hadapsar police arrested him in this case.
social share
google news

Pune Crime News : पुण्यात एक भयंकर घटना घडली आहे. एका सावकाराने ज्या व्यक्तीला पैसे दिले होते, त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. उसने पैसे दिलेल्या व्यक्तीसमोरच सावकाराने हे कृत्य केले आहे. कळस म्हणजे सावकाराने या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. 34 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून खासगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवले आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. ही घटना घडली पुण्यातील हडपसर भागात. फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 47 वर्षीय सावकार इम्तियाज हसीन शेख याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीये.

सावकाराचा महिलेवर बलात्कार, नेमकं काय घडलं?

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सावकाराने पीडित महिलेच्या पतीला उसने पैसे दिले होते. महिलेचा पती पैसे परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलवून घेतले.

वाचा >> MNS Toll: ‘टोलचा सगळा पैसा घेणारा म्हैसकर कोणाचा लाडका…’, राज ठाकरे प्रचंड संतापले

पती-पत्नी तिथे पोहोचले. त्यानंतर सावकाराने महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी दिली. पतीला खाली बसवून आरोपी सावकाराने तिथेच महिलेवर बलात्कार केला.

वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?

अत्याचार करतानाचा बनवला व्हिडीओ

आरोपी सावकाराने अत्याचार करतानाच्या कृत्याचा व्हिडीओ बनवला. या व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले आणि शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. महिलेने आरोपीला नकार दिला. त्यानंतर सावकाराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

वाचा >> No Confidence Motion : पराभव निश्चित… तरीही मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का?

आरोपीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर महिलेने हडपस पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि झालेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आणि आरोपी इम्तियाज हसीन शेखला अटक केली. आता पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp