Crime: आईचे 21 वर्षीय तरूणासोबत संबंध, मुलीनेच…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mother affair with boy girl social media star killed her uk crime story
mother affair with boy girl social media star killed her uk crime story
social share
google news

देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 46 वर्षीय महिलेचे 21 वर्षीय तरूणासोबत अनैंतिक संबंध होते. या संबंधातून तरूण हा महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करायचा. आता या ब्लॅकमेलिंगमधून तरूणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. नेमकी की संपूर्ण घटना का आहे हे, जाणून घेऊयात.( mother affair with boy girl social media star killed her uk crime story)

ADVERTISEMENT

न्युयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 46 वर्षीय अंसरीन बुखारी आणि 21 वर्षीय हुसैन या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमप्रकरणात सुरूवातीला दोघांमध्ये सर्व काही चांगलं चालले होते. दोघांचे नातं पुढे सरकत असतानाच हुसैनने अंसरीनला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. हुसैनने अंसरीनचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली.

दोघांच्या नात्याची सर्वांना माहिती मिळावी यासाठी हुसैन अशाप्रकारचे कृत्य करत होता. तर आपल्या नात्याची कुणालाही माहिती न व्हावी यासाठी अंसरीन त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हुसैन काही एक ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे अखेर वैतागून अंसरीनने त्याच्यासोबत नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Gay Dating App वरुन बोलवलं, शारीरिक संबंध आणि न्यूड व्हिडीओ; तरुणाने…

या संपूर्ण प्रकरणाची कल्पना अंसरीनची 24 वर्षीय मुलगी महक बुखारीला होती. त्यामुळे तिने आईला बॉयफ्रेंडकडून देत असलेल्या त्रासाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महकने हुसैनला तोंड बंद ठेवण्यासाठी 3000 डॉलर दिले होते. हे पैसै घेण्यासाठी तिने हुसैनला एका ठराविक ठिकाणी बोलावले होते. त्यानुसार हुसैन घरातून निघाला असता त्याचा पाठलाग दोन कार करत होत्या. या दरम्यान हुसैनने पोलिसांना फोन करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली. तितक्यातच पाठलाग करणाऱ्या गाडीने त्याला टक्कर दिली आणि दोघांचा अपघाती मृत्यू झाला. अशाप्रकारे महकने आईसोबत होत असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बदला घेतला होता.

ADVERTISEMENT

पीडित व्यक्तीने मृत्यूपुर्वीच माहिती दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासात पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. तसेच हे प्रकरण पुढे जाऊन इंग्लंडच्या लीसेस्टर क्राऊन कोर्टात पोहोचले. यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी 29 वर्षीय रेखान कारवान, 23 वर्षीय रइस जमालाला हुसैनच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. तर 28 वर्षीय अमीर जलाल आणि 23 वर्षीय सनफ गुलामुस्तफाला हत्येत सहभागी असल्या कारणाने दोषी ठरवण्यात आले. हे सर्व आरोपी हुसैनच्या पाठलाग करणाऱ्या कारमधून प्रवास करत होते. तसेच कोर्टाने अंसरीनला ही दोषी ठरवले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : प्रेम, अपहरण आणि गँगरेप… गर्लफ्रेंडच्या अब्रूचे मित्रांसोबत महिनाभर तोडले लचके

या प्रकरणात आरोपींना लवकरच शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच मुख्य आरोपी महत बुखारी हिला अद्याप तरी पोलिसांनी ताब्य़ात घेतले नाही आहे. त्यामुळे तिचा तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT