Nagpur : मायलेकराचा भयंकर शेवट! मुलाने संपवलं आयुष्य, आईनेही घेतलं विष
नागपूरमध्ये 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या आईनेही विष प्राशन करून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
Nagpur news in marathi : 20 वर्षाच्या पोटच्या पोराने घरात कुणी नसताना गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्यांच्या अशा जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघातच झाला. मुलाच्या अशा जाण्याने आईच्या मनावर आघात झाला आणि तिनेही काही तासांतच विष प्राशन करून मृत्यूला कवटाळलं. नागपुरातील लकडगंज परिसरात घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचं कारणही समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
खितेन नरेश वाधवानी (वय 20) असे मृतक मुलाचे नाव असून, दिव्या नरेश वाधवानी असे त्याच्या आईचे नाव आहे. खितेन हा नागपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
नागपुरातील लकडगंज परिसरात घडलेल्या या घटनेला कारण ठरलं आहे सट्टा. क्रिकेट सट्टाच्या नादात मोठ्या प्रमाणात पैसे हरल्यामुळे नैराश्यात जाऊन खितेनने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या आईने देखील काही तासांत विष प्राशन करून मृत्यूला जवळ केले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने का फटकारलं?
नागपुरातील लकडगंज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या छापूनगर परिसरात या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खितेन वाधवानी हा नागपुरातील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी होता, परंतु चुकीची संगत लागल्यामुळे तो क्रिकेट सट्ट्याकडे वळला.
गेल्या वर्षीही सट्टेबाजीत हरला होता पैसे
मागील वर्षी तो IPL मध्ये काही पैसे हरला होता. ही बाब त्याने घरच्यांना सांगितली सुद्धा होती. त्याच्या वडिलांनी हरलेल्या रकमे इतके पैसे दिले होते. मात्र यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरून तो आयपीएल सट्ट्यावर पैसे लावू लागला.
ADVERTISEMENT
यावर्षी सुद्धा तो आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानीत राहिला. नंतर सट्टेबाज पैशासाठी त्रास देऊ लागले, यातूनच तो तणावात गेला आणि रविवारी रात्री त्याचे कुटुंबीय बाहेर एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
धक्का बसला आणि आईने घेतले विष
मुलाच्या आत्महत्येची धक्कादायक बातमी कानावर पडताच आई दिव्या वाधवानी यांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर सोमवारी दुपारी विष प्राशन केले. कुटुंबीय खितेनच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत असतानाच, या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाईक पुन्हा हादरले.
हेही वाचा >> मविआत जागावाटपाबाबत छगन भुजबळांचं मोठं स्टेटमेंट, म्हणाले, ‘तो निकष वापरला जाईल’
नागपुरातील या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT