Marine Drive hostel : मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai latest Crime news : 19 year old Girl Student's Naked Body Found At Marine Drive Hostel, Suspect Security Guard Commits Suicide
Mumbai latest Crime news : 19 year old Girl Student's Naked Body Found At Marine Drive Hostel, Suspect Security Guard Commits Suicide
social share
google news

Mumbai crime news Marathi : वसतिगृहाच्या खोलीत एका विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थतेतील मृतदेह सापडल्याने मुंबईत (Mumbai crime news today) खळबळ उडाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील शासकीय वसतिगृहात मंगळवारी (6 जून) रात्री ही घटना घडली. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीची हत्या गळा दाबून करण्यात आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांना असून, त्या दिशेनेही तपास केला जात आहे. (19 year old Girl naked body found in hostel at marine Drive in Mumbai)

ADVERTISEMENT

मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात (Savitribai Phule hostel, Mumbai) 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला. विद्यार्थिनीचा मृतदेह बाहेरून बंद असलेल्या खोलीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थिनी ही मूळची वसतिगृहात राहत होती. ती वांद्रे येथील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बाहेरून होता बंद

मंगळवारी दुपारी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला.

हेही वाचा >> सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा

सुरक्षा रक्षकाची रुळावर आत्महत्या

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचे नंतर समोर आले. ओमप्रकाश कनोजिया असं त्याचं नाव असून, तो सकाळपासून गायब होता. सकाळी 6 वाजताच्या सुमारास या सुरक्षारक्षकाने ग्रँट रोड ते चर्नी रोड स्थानकादरम्यान लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

हेही वाचा >> भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?

मयत सुरक्षारक्षक मागील 15 वर्षांपासून काम करत होता. तो पहाटे तीन वाजता चौथ्या मजल्यावर गेला आणि तासाभराने बाहेर पडला, असं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला.

ADVERTISEMENT

वडिलांनी फोन केल्यामुळे सुरू झाली शोधाशोध

समोर आलेल्या माहितीनुसार मयत विद्यार्थिनीला तिचे वडील सकाळपासून कॉल करत होते. मुलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तिच्या मैत्रिणींकडे याबद्दल विचारपूस केली. त्यानंतर मयत विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. तिच्या खोलीच्या दरवाजालाही बाहेरून कुलूप होते. त्यानंतर याची माहिती पोलिसांनी देण्यात आली आणि तिचा खोलीतच विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT