Mumbai Crime : बायकोला मारतच सुटला, जीव जाईपर्यंत सोडलं नाही; नवऱ्याने का केली हत्या?
गुरूवारी 7 डिसेंबरला नेहमीप्रमाणे अन्सारीने दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. अन्सारीच्या या मागणीला परवीनने विरोध करताच, त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण लागले. या भांडणातून अन्सारीने परवीनला बेदम मारहाण करायला सुरूवात केली.
ADVERTISEMENT
Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवऱ्याने (husband) आपल्याच बायकोची (Wife) हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. परवीन अन्सारी (26) असे या मृत महिलेचे नाव आहे. परवीन आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत भांडणे व्हायची. या भांडणाच्या रागातून नवऱ्याने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पळ काढताना पोलिसांनी (Police) त्याला रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (mumbai crime news husband killed his wife not giving money for alcohol in mumbai)
ADVERTISEMENT
मुंबईतील गोरेगाव (Goregaon) परिसरात अन्सारी हे जोडपं राहते. आरोपी अन्सारी यांना दररोज दारू पिण्याची सवय होती. या सवयीला परवीन अन्सारी खुप वैतागल्या होत्या. अनेकदा अन्सारीकडे दारू पिण्यासाठी पैसे देखील नसायचे तेव्हा तो परवीनकडून पैशाची मागणी करायचा, या मुद्यावरून अनेकदा दोघांमध्ये भांडणे देखील व्हायची. याच भांडणातून आता परवीनची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
हे ही वाचा : Nawab Malik : “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट
गुरूवारी 7 डिसेंबरला नेहमीप्रमाणे अन्सारीने दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. अन्सारीच्या या मागणीला परवीनने विरोध करताच, त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण लागले. या भांडणातून अन्सारीने परवीनला बेदम मारहाण करायला सूरूवात केली. अन्सारीने परवीनला इतकी मारहाण केली की तिचा जीवच गेला. त्यामुळे परवीनची हत्या झाल्याचे समजताच अन्सारीने घटनास्थळावरून पळ काढला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Rape Case: अश्लील Video शूट करून दोन भावांचा बहिणीवर गँगरेप, गर्भवती झाल्यावर…
दरम्यान स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ परवीनला रूग्णालयात दाखल केले़. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.त्यामुळे या प्रकरणाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी रूग्णालय गाठत परवीनचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टममार्टम रिपोर्टमधून परवीनच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
परवीनच्या हत्या प्रकरणात तिच्याच दारूड्या पतीचा हात असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी तपासाला सूरूवात केली.दरम्यान हत्या प्रकरणानंतर अन्सारी शहर सोडून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून त्याला बोरीवली स्थानकातून अटक केली. या प्रकरणी आता अन्सारीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT