Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Crime : college girl found dead at Marine Drive hostel room, police probe rape angle; suspect dies by suicide
Mumbai Crime : college girl found dead at Marine Drive hostel room, police probe rape angle; suspect dies by suicide
social share
google news

-धनंजय साबळे, अकोला

ADVERTISEMENT

Mumbai Crime News Today : “माझी मुलगी दररोज फोन करायची, पण कालच (6 जून) केला नाही. त्यानंतर मी तिला वारंवार फोन केला, पण तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर पोलिसांचाच फोन आला. माझी मुलगी नेहमी कनोजिया सुरक्षारक्षकांची तक्रार करत होती. मल त्याची भीती वाटते, असं ती नेहमी सांगायची.” हे शब्द आहेत मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात हत्या झालेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांचे. ज्या चौकीदाराने लोकल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याची तक्रार मयत विद्यार्थिनीने आधीच वडिलांना केली होती. (College girl found dead in hostel room in mumbai)

मुंबईतील चर्चगेटजवळ असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात मंगळवारी सगळेच हादरले! एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहातील खोलीत विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेतील संशयित सुरक्षारक्षकाने लोकल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा >> मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह, काय घडलं?

मयत विद्यार्थिनीचे वडील अकोला येथे पत्रकार आहेत. मुलीचे वडील पुरी यांच्याकडून ‘मुंबई Tak’ने घटनेची माहिती घेतली. त्यावेळी काही धक्कादायक बाबी समोर आल्या.

मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी काय सांगितलं?

मुलीचे वडील म्हणाले, “माझी मुलगी रोज फोन करत असते, पण कालच केला नाही. वारंवार मी तिला फोन केला, पण कोणताच रिप्लाय येत नव्हता आणि काही वेळातच मला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मुलीची ओळख सांगून मला लगेच मुंबईला यायला सांगितले. आज मी मुंबईत पोहोचलो आहे.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!

“माझी मुलगी होस्टेलमध्ये एकटीच कुलूप बंद स्थितीत आढळली. माझी मुलगी सुरक्षित नव्हती म्हणूनच हा प्रकार घडला. संबंधित वसतिगृह संचालक किंवा तेथील जबाबदार व्यक्तींवर गुन्हा नोंदवल्याशिवाय मी माझ्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही”, असा संताप मयत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

“माझी मुलगी नेहमी कनोजिया या चौकीदाराची माझ्याकडे तक्रार करायची. ‘त्याची मला भीती वाटते’, असे सांगायची. ‘मॅडम… ज्या वसतिगृहाच्या अधीक्षक आहेत, त्यांची भीती वाटते की नेमकं त्यांना कसं सांगावं’, असंही म्हणत होती”, अशी माहिती पुरी यांनी मुंबई Tak ला दिली.

तिकीट बुक केलं, पण घरी पोहोचलीच नाही

मयत विद्यार्थिनीचे तिच्या वडिलांनी घरी येण्यासाठी 8 जून रोजीचे रिझर्व्हेशन केले होते. “घरी आल्यावर आपण बोलू आणि यावर मार्ग काढू, असं मी तिला म्हणालो होतो. पण, त्याआधीच मुलीसोबत अशी घटना घडली. ज्यामुळे मी हादरून गेलो आहे.

हेही वाचा >> Cabinet Expansion in Maharashtra : शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?

याप्रकरणी डीसीपी प्रवीण मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, “आम्ही गुन्हा नोंद केला असून, याबाबत तपास करत आहोत. ज्याने हे सर्व केलं आहे, त्याने चर्नीरोड रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे खाली झोपून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आता आमचा तपास सुरू असून यामध्ये वस्तीगृह संचालकाचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पुराव्यानिशी कायदेशीर कारवाई केली जाईल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT