Mumbai crime : ‘वाढदिवसाला भेट, प्रेम अन् बलात्कार’, मॉडेलने दाखवले व्हिडीओ
मुंबईतील मॉडेलने एका व्यक्तीवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime News : मुंबईतील एका मॉडेलने एका अनिवासी भारतीय व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी वीरेन पटेल याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. पटेल आपल्याला मारहाण करायाचा, असा आरोपही तिने केला आहे. (A model in Mumbai has accused an NRI living in Tanzania of assault and rape)
ADVERTISEMENT
मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने टांझानियामध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीयावर मारहाण आणि बलात्काराचा आरोप केला. याप्रकरणी मॉडेलने मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हाही दाखल झाला आहे. मॉडेलने यासंदर्भातील दोन व्हिडिओ पोलीस आणि मीडियाला दिले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी मॉडेलला मारहाण करत आहे.
वाचा >> ‘मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार’; धमकी देणाऱ्याला अटक, नावंही आलं समोर
पीडित मॉडेलच्या आरोपांनुसार, ती आरोपी वीरेन पटेल याच्याशी वर्षभरापूर्वी एका वाढदिवसाच्या पार्टीत भेटली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत गेली.
हे वाचलं का?
वाचा >> नितीन देसाईंच्या मुलीचा खळबळजनक आरोप, “कंपनीची खोटी आश्वासनं, फसवणूक…”
वीरेन पटेलने तिला लग्नाचे वचन दिले आणि तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. पुढे मॉडेलने असंही म्हटलं आहे की, “तो अनेकदा दारू पिऊन माझ्याशी भांडू लागला, धमक्या देऊ लागला.” त्याच्या छळाला कंटाळून मॉडेलने आरोपीविरुद्ध तक्रार दिली. मुंबई पोलिसांनी भादंवि कलम 376, 323, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाचा >> रत्नागिरी : बँकेतून निघाली पण…, आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसही ‘शॉक’
पीडित मॉडेलने पोलीस आणि सरकारला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर टांझानियाला पळून जाऊ शकतो, असंही म्हटलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत पीडितेच्या या आरोपावर पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT