बारामतीत खळबळ! दगडाने डोक्याचा केला चेंदामेंदा, ऊसात सापडला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

murder of young man in sugarcane field indapur police pune baramati crime story
murder of young man in sugarcane field indapur police pune baramati crime story
social share
google news

पुणे (Pune) जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये (Indapur) उसाच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दगडाने ठेचून या व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरदेवडी टोल बूथ जवळील उसाच्या शेतात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरु केला आहे. साधारण 30 ते 35 असे या मृत व्यक्तीचे वय असल्याची माहिती आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. पण त्याच्या खिशातून एक एसटीचं तिकीट, फास्ट टॅग आणि मोबाईल हेडफोन आढळला आहे. या पुराव्याच्या आधारे आता इंदापूर पोलिसांनी या हत्येचा तपास करायला सुरुवात केली आहे. (murder of young man in sugarcane field indapur police pune crime story)

ADVERTISEMENT

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरदेवडी टोल बूथ जवळ असणाऱ्या एका उसाच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. 12 जुलैच्या सकाळी ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी गाठत तपास सुरु केला आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून हत्येचे नेमकं काय कारण समोर येते, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : Kalyan Crime: दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावलं अन गेला जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इंदापूर तालुक्यातील सरदेवडी टोल बूथ जवळील उसाच्या शेतात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. दगडाने ठेचून या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीच्या खिशातून एक एसटीचं तिकीट सापडलं होतं. या तिकिटातून मृत व्यक्तीने बसचा प्रवास केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बस तिकीटासह घटनास्थळावरून पोलिसांना एक फास्ट टॅग आणि हेडफोन देखील आढळला आहे. हे तीनही पुरावे पोलिसांनी ताब्यात घेऊन हत्येचा तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

नेमकी मृत व्यक्तीची हत्या का करण्यात आली आहे. यामागचं ठोस कारण अद्याप पोलिसांना सापडलं नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टम अहवालातून हत्येचं नेमकं कारण समोर येणार आहे. इंदापूर पोलिस आता मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबत नेमकी ही हत्या कोणी केली? या हत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न सूरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : 25 वर्षीय तरुणीचे अर्ध जळालेलं मांस खाल्लं, दोघांनी का केलं किळसवाणं कृत्य?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT