Nalasopara Crime : बंद खोली, कुजलेला मृतदेह अन्…, अल्पवयीन मुलीची हत्या कुणी केली?
अखेर सोमवारी साह कुटुंब राहत असलेल्या बैठ्या चाळीतील एका खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिकांनी बैठ्या चाळीतील पाच नंबर खोली उघडली असता त्यांना हादराच बसला.
ADVERTISEMENT
Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 8 वर्षीय मुलीची (Girl killed) निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चांदनी साह असे असे या मुलीचे नाव आहे. ज्या चाळीत ही मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहायची त्याच चाळीतील एका खोलीत तिचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. या घटनेने आता खळबळ माजली आहे. त्यामुळे या 8 वर्षीय निष्पाप मुलीची हत्या कोणी केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत. (nalasopara crime news 8 year old chandani sah dead body found in chawl closed room pelhar police investigate crime)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई फाटा (Vasai Phata) येथील वाण्याचा पाडा या भागात विजय साह त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. या विजय साह यांची 8 वर्षीय मुलगी चांदनी साह घराजवळून शुक्रवारी बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर विजय साह यांनी पेल्हार पोलीस (Pelhar Police) स्टेशन गाठून 8 वर्षीय मुलगी चांदणी साह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यासोबत चांदणीचा शोध लावण्यासाठी तिचे जागोजागी बेपत्ता असल्याचे पोस्टरही लावण्यात आले होते. आणि तिचा शोधही सुरु करण्यात आला होता. मात्र तीन दिवस उलटून देखील तिचा कुठेचा थागपत्ता लागला नव्हता.
हे ही वाचा : Shiv sena UBT: वरूण सरदेसाईंचं तिकीट झालं पक्कं, ठाकरेंनी मतदारसंघही ठरवला!
अखेर सोमवारी साह कुटुंब राहत असलेल्या बैठ्या चाळीतील एका खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिकांनी बैठ्या चाळीतील पाच नंबर खोली उघडली असता त्यांना हादराच बसला. कारण खोलीत एक मृतदेह आढळला होता. स्थानिकांनी लगेचच या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठून तपासाला सुरूवात केली. यावेळी खोलीत एका प्लॅस्टीक बॅगमध्ये एका मुलीचा मृतदेह कोंबण्यात आला होता. तसेच या मृतदेहाचे हात-पाय देखील बांधण्यात आले होते. हा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून चांदणी साहचा होता. त्यामुळे ही घटना उघडकीस होताच एकच खळबळ माजली होती.
हे ही वाचा : Cyclone: मिचॉन्ग चक्रीवादळाचा चेन्नईत हैदोस; 5 जणांचा मृत्यू! दक्षिणेकडील राज्यांना रेड अलर्ट
पोलिसांनी चांदनी साहचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच पोलीस या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. आता या प्रकरणी निष्पाप चांदनी साहची हत्या कोणी केली? व चांदनीच्या हत्येमागचं कारण काय? या सर्व दिशेने पेल्हार पोलिसांनी तपास करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या घटनेमागे आता काय उलगडा होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT