Crime : धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या घरात आढळला तरूणाचा मृतदेह; हत्येचा संशय

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

narhat congress mla neetu singh house dead body found nawada bihar story
narhat congress mla neetu singh house dead body found nawada bihar story
social share
google news

Congress Mla Neetu singh house dead body found : काँग्रेसच्या महिला आमदाराच्या घरात एका तरूणाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता या तरूणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या मृत तरूणाचे नाव 24 वर्षीय पियुष कुमार उर्फ सुद्दू असे आहे. हा पियुष एक दिवसापुर्वीच बेपत्ता झाला होता. यानंतर अचानक त्याचा मृतदेह काँग्रेस आमदाराच्या घरात आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या घटनेत तरूणाने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली आहे? तसेच त्याची हत्या झाली असल्यास यामध्ये आमदाराचा हात आहे का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. (narhat congress mla neetu singh house dead body found nawada bihar story)

ADVERTISEMENT

बिहारच्या (Bihar) नवादाममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हिसूआच्या काँग्रेसच्या महिला आमदार नीतू सिंह (Neetu singh) यांच्या घरात पियुष कुमारचा मृतदेह आढळला आहे. पियुष हा काँग्रेस आमदाराचा निकटवर्तीय प्रिन्स कुमारचा भाऊ होता. या घटनेची माहिती मिळताच नवादाचे पोलीस अधिक्षक अंबरीष राहुल, रजोलीचे एसडीपीओ पंकज कुमार आणि मेसकोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एफएसएल आणि डॉग स्क्वॉडच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

हे ही वाचा : NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!

नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 25 ऑक्टोबरपासून आमदार नीतू सिंह पाटण्यात आहेत. त्यामुळे त्यांचे घर खालीच होते. नितू सिंह यांच्या कुटुंबातील एकही सदस्य घरात उपस्थित नव्हता.दरम्यान या घटनेत पियुषची नेमकी हत्या कशी झाली आहे? याचा अद्याप खुलासा होऊ शकला नाही आहे. पण या हत्या प्रकरणात गोलू सिंह नाव समोर येत आहे. हा गोलू आमदार नीतू सिंह यांचे मेहुणे सुमन सिंह आणि काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष आभा सिंह यांचा मुलगा आहे. मृत तरुणही आमदाराच्या कुटुंबातील सदस्य आहे. गोलू आणि मृत पियुष हे चुलत भाऊ होते.

पोलीस अधिक्षक अंबरीष राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास नरहट पोलीस ठाण्याला आमदार नीतू सिंह यांच्या बंद घरात तरूणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांना एका खोलीत मृतदेह आढळला. मृत तरूणाचे नाव पियुष सिंह होते, तो आमदाराचा दुरचा नातेवाईक होता. तसेच आमदाराच्या घरातील ज्या खोलीत तरूणाचा मृतदेह आढळला होता, ती खोली गोलू सिंहची होती. गोलू सिंह हा नीतू सिंहचा भाचा असून त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. तसेच पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेतील आरोपीला लवकरच अटक करून असे अंबरीष राहुल यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Mukesh Ambani : “आता 20 नाही, 200 कोटी द्या, नाहीतर…”, अंबानींना धमकी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT