Crime : नवी मुंबई हादरलं! बिल्डराला कार्यालयात घुसून संपवलं, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

navi mumbai builder manoj singh shot dead murder story crime news
navi mumbai builder manoj singh shot dead murder story crime news
social share
google news

निलेश पाटील, नवी मुबई, : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बिल्डराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोज सिंह असे या बिल्डराचे नाव आहे. विशेष म्हणजे या बिल्डराची त्याच्याच ऑफिसात हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (navi mumbai builder manoj singh shot dead murder story crime news)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सिंह यांचे नवी मुंबईतील सीवुडस सेक्टर 44 मध्ये अमन बिल्डर नावाचं ऑफिस आहे. या ऑफिसात मनोज सिंहचा मृतदेह आढळला आहे. सकाळी त्यांच्या ऑफिसचे कर्मचारी कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्खळी दाखल होऊन घटनेचा तपास सूरू केला आहे.

हे ही वाचा : CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, ‘बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण हे ‘घरगडी’

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मनोज सिंह यांच्या डोक्यात गोळी लागली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मनोज सिंह यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. मात्र घटनास्थळावरून पोलिसांना रिव्हॉल्व्हर सापडली नाही आहे.त्यात कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे हत्येचा संशय व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणी पोलीसांनी चहा विक्रेता, कार्यालयातील कर्मचारी आणि मृत मनोज सिंह यांच्या पत्नीची चौकशी केली होती. मात्र या चौकशीतून मनोज सिंह यांची हत्या झाली आहे की, ही आत्महत्येची घटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. दरम्यान मनोज सिंह यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. तसेच पोलीस तपासानंतर ही हत्या असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray: ‘मी तेव्हा चूक केली… बापाची जहागिरी वाटते..’, कल्याणमध्ये ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीकेची झोड

घटनेच्या आदल्या दिवशी रात्री मनोज सिंह यांच्या कार्यालयात एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली असल्याची कुजबुज सुरू होती. आणि या महिलेनेच हत्या केल्याचा संशय आहे. आता पोलिसांनी मनोज सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे खरं कारण समोर येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT