सांगली हादरली! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या घालून हत्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सांगली शहरातील 100 फुटी रोड जवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
NCP Worker shot dead in Sangli : रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा पडल्याच्या घटनेने सांगलीतील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच आता आणखी एक भयंकर घटना घडली आहे. सांगली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नालसाब मुल्ला असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
गोळ्या घालून हत्या प्रकरणाने सांगलीत खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 8 गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना शहरातील 100 फुटी रोड जवळील नालसाब मुल्ला यांच्या घरासमोरच घडली. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर मुल्ला जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या कशी झाली?
नालसाब मुल्ला हे त्यांच्या घराच्या दरवाज्यात बसलेले होते. त्याचवेळी काही हल्लेखोर तिथे आले. क्षणार्धातच त्यांनी नालसाब मुल्ला यांच्या दिशेने गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरारही झाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या
गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. मुल्ला यांच्यावर 8 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या मुल्ला यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
हत्या का करण्यात आली?
नालसाब मुल्ला यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, हत्येच्या घटनेनं शहरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस, गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> खुर्च्या फेकल्या, तुफान हाणामारी…युवक कॉग्रेसच्या बैठकीत काय घडलं?
मुल्लांची जिथे हत्या झाली, तो वर्दळीचा परिसर आहे. आरोपी गोळीबार करून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, आरोपी कोणत्या दिशेने आले आणि कोणत्या दिशेने गेले, याबद्दलही पोलिसांनी माहिती घेतली आहे. पोलीस सध्या हत्येचे कारण शोधत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT