NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!
एनआयएकडून इसिस मॉड्यूल प्रकरणात पुण्यात अटकेची कारवाई केली. डॉ. अदनान अली सरकार याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
NIA Raids in Pune : केंद्रीय दहशतवाद विरोधी तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने पुण्यातून एका डॉक्टरला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. एनआयएने दहशतवादविरोधी कृत्य केल्याच्या आरोपाखाली या डॉक्टरला अटक केली असून, हा डॉक्टर तरुणांना इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी मनं वळवत असल्याचा दावा केला गेला आहे.
ADVERTISEMENT
इसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं इसिसशी संबंधित एका डॉक्टरला अटक केली. पुण्यातील कोंढवा भागातून ही अटक करण्यात आली असून, डॉ. अदनानली सरकार (वय 43) असे या व्यक्तीचे नाव आहे. एनआयएकडून करण्यात आलेल्या कारवाईतील ही पाचवी अटक आहे.
डॉ. सरकारच्या घरात काय आढळलं
समोर आलेल्या माहितीनुसार अदनानली सरकार याच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इसिसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार हा तरुणांची मनं वळवून या संघटनेसाठी भरत करत असल्याचे या कागदपत्रांतून आढळून आल्याचा दावा एनआयएने केला आहे.
हे वाचलं का?
वाचा >> फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…
एनआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, डॉ. सरकार हा देशात अशांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यातून एका अभियंत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली गेली होती.
मुंबईतून चौघांना अटक
3 जुलै रोजी एनआयएने मुंबईतून चार जणांना अटक केली होती. तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्याच्या शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला अशी मुंबईतून अटक केलेल्यांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
वाचा >> Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…
NIA ARRESTS 1 MORE IN MAHARASHTRA ISIS MODULE CASE, TOTAL ARRESTS GO UPTO 5 pic.twitter.com/0aBboS0wYW
— NIA India (@NIA_India) July 27, 2023
ADVERTISEMENT
कोण आहे डॉ. अदनानली सरकार?
एनआयएने अटक केलेला अदनानली सरकार पेशाने डॉक्टर आहे. त्याने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून 2001 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. 2006 मध्ये अदनानली सरकारने भूलतज्ज्ञ म्हणून एम.डी. पदवी प्राप्त केली. सरकारने अॅनेस्थेशिया या विषयात रिसर्च पेपर लिहिले आहेत. 16 वर्षांपासून भूलतज्ज्ञ म्हणून तो काम करत होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT