Washim Crime : मुलाच्या ‘त्या’ सवयीने वैतागला, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं
.वृद्ध बापाने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून मुलाची निर्घृण हत्या केली. शरद सोनोने असे या 45 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आता धनज पोलिसांनी 70 वर्षीय वृद्ध बाप आकाराम सोनोनेला अटक केली आहे. या घटनेनंतर परीसरात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
-जका खान, वाशिम
ADVERTISEMENT
Old father killed her son Washim Crime News : वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 70 वर्षीय वृद्ध बापानेच आपल्याच मुलाची हत्या केल्याची घटना घडलीय.वृद्ध बापाने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून मुलाची निर्घृण हत्या केली. शरद सोनोने असे या 45 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आता धनज पोलिसांनी 70 वर्षीय वृद्ध बाप आकाराम सोनोनेला अटक केली आहे. या घटनेनंतर परीसरात खळबळ माजली आहे. (old father killed her son with iron rod due to liquor habit crime story washim)
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालूक्यातील मसला गावात सोनोने कुटुब राहतं. या कुटुंबातील शरद सोनेची आता हत्या करण्यात आलाी आहे. शरद सोनेची हत्या त्याच्याच वृद्ध बापानं केली आहे.त्यामुळे परीसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी 31 ऑक्टोबरला शरद सोनाने रात्री साधारण 8 वाजताच्या सुमारास घरी आला होता.शरद सोनोने दारूनच्या नशा करून घरी आला होता. खरंतर शरद सोनोनेचा हा नित्यक्रम होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नशेत शरद घरी आला आणि बायकोशी आणि वडिलांशी वाद घालू लगा.
हे ही वाचा : LPG Price Hike: दिवाळीआधीच झटका! LPG सिलिंडर महागला, किती वाढले दर?
शरदच्या या नेहमीच्या त्रासाला वडील आकाराम सोनोने आधीच वैतागले होते. त्यात घटनेच्या दिवशी शरदने दारूच्या नशेत घरात येऊन वडील आकाराम सोनोने यांना धक्काबुक्की करायला सुरूवात केली. या धक्काबुक्कीनंतर शरद सोनोने त्यांच्या पलंगावर जाऊन झोपी गेला होता. त्यामुळे शरदच्या या सततच्या त्रासाला कंटाळून आकाराम सोनोने यांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शरद सोनोने जागीच मृत्यू झाला.
शरद सोनोने हा टॅक्टर चालवायचा आणि यातून होणाऱ्या कमाईतू तो दारू प्यायचा. साधारण 2 वर्षापासून शरदला दारूची सवय होती. त्याच्या या दारूच्या सवयीमुळेच त्याच्या पत्नीने 15 दिवसापुर्वी माहेरी जाणार असल्याचे सांगितले होते. शरदला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या डोक्यावरील आता वडिलांचे छत्र हरपले आहे.
ADVERTISEMENT
या घटनेप्रकरणी आता धनज पोलिसांनी आरोपी वृद्ध वडील आकाराम सोनोनेला अटक केली आहे.तसेच त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. या घटनेनंतर परीसरात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोठी बातमी.. राज्यात ‘एवढ्या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, पाहा सरकारचा जीआर!
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT