पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!
Crime: बायकोची हत्या करणाऱ्या पोलीस नवऱ्याला त्याच्या पोलीस सासऱ्यानेच जन्मभराची अद्दल घडवली आहे. बायकोच्या खून प्रकरणात उस्मानाबाद जिल्हा सत्र कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

धारशिव: येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना उस्मानाबाद जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी बायकोच्या खुनात (Wife Murder) दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. सपोनि चव्हाण हे अटक झाल्यापासून कारागृहात आहेत, हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत (अंडर ट्रायल) ठेवून चालविले गेले हे विशेष. (osmanabad district session court sentenced the policeman husband who killed his wife to life imprisonment)
25 जानेवारी 2018 रोजी सकाळी येरमाळा पोलीस ठाण्यातील सपोनि विनोद चव्हाण यांची पत्नी मोनाली यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
नेमकी घटना काय?
मोनाली व विनोद चव्हाण यांचा 2014 साली विवाह झाला होता. लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूल होत नाही या कारणावरून नैराश्येतून मोनाली यांनी पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले गेले होते. मात्र अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोनालीचे वडील शेषांक जालिंदर पवार ( रा. चौसाळा जि. बीड ) यांनी मुलगी मोनालीने आत्महत्या केली नसून तिचा चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेली 5 लाख रुपयांची रक्कम आण म्हणून पतीनेच खून केल्याची तक्रार दिली होती. मोनालीचे वडील शशांक पवार हे शिरूर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत होते.
हे ही वाचा >> धीरेंद्र आचार्याच्या शिष्याचा प्रताप! कथेचं आयोजन करणाऱ्याच्या पत्नीलाच पळवलं
मयत मुलीचे वडील शशांक पवार यांच्या तक्रारीवरून नवरा सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाणसह सासू विमल चव्हाण, सासरा बापू चव्हाण या तीन आरोपी विरोधात भादंवि कलम 302,498 अ व 34 अन्वये गुन्हा नोंद करून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे देण्यात आला होता. हे हत्याकांड त्यावेळी राज्यभर गाजले होते. यातील सासू विमल चव्हाण व सासरा बापूराव चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आरोपी सपोनि चव्हाण यांनी खून केल्यानंतर हे प्रकरण लपवण्यासाठी काही पुरावे नष्ट केले. त्यामुळे कलम 201 अंतर्गत 7 वर्ष सश्रम करावासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. पत्नीच्या खुनात दोषी ठरवित जन्मठेपेची व 50 हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दोषी ठरलेल्या विनोद चव्हाणला दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.
हे ही वाचा >> शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रश्मी नरवाडकर यांनी बाजू मांडली. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलात मात्र खळबळ माजली आहे.