छमछम! पुणे-साताऱ्यातील डॉक्टरांचे तोकड्या कपड्यातील 4 तरुणींसोबत चाळे, नावे आली समोर

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

panchgani spring resort police raid on hotel arrested 6 doctor hotel owner and 4 girl custody mahabaleshwar news 
panchgani spring resort police raid on hotel arrested 6 doctor hotel owner and 4 girl custody mahabaleshwar news 
social share
google news

Mahabaleshwar panchgani spring resort police raid : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या (Mahabaleshwar)  पाचगणीतील (panchgani)  एका रिसॉर्टवर छुप्या पद्धतीने छम छम डान्स सुरु होता. या छमछमची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून पाच डॉक्टरांसह एक फार्मासिस्ट आणि हॉटेल मालकाला अटक केली आहे. तसेच हॉटेलमध्ये डान्स करणाऱ्या त्या चार तरूणींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे. (panchgani spring resort police raid on hotel arrested 6 doctor hotel owner and 4 girl custody mahabaleshwar news)

ADVERTISEMENT

पाचगणी कासवंड गावातीलच स्प्रिंग रिसॉर्टमधील एका हॉटेलमधील हॉलमध्ये मंगळवारी छम छम डान्स सुरु होता. या छमछमसाठी सांगली आणि पुण्यातून खास करून चार डान्सर तरूणी मागणवण्यात आल्या होत्या. या तरूणी हॉटेलमध्ये तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव आणि अंगविक्षेप करत नाचत होत्या. अशाप्रकारे हॉलमध्ये हा छम छम सुरू होता.

हे ही वाचा : “शिवाजी महाराज रेडे कापायला सुरतेवरून गुवाहाटीला गेले नव्हते”, राऊत-पटोले संतापले

या छम छमची माहिती अतिरिक्त वरिष्ठ पोलीस आचल दलाल यांना खास सुत्रांनी दिली होती. त्यानुसार आचल दलाल यांनी साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना केले होते. हे पथक घटनास्थळी पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यावर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज असे सहा ते सात जण दारूच्या नशेत डान्सरच्या समोर झिंगत असतानाच पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

हे वाचलं का?

डॉ. मनोज विलास सावंत (रा. दहिवडी), डॉ. राहुल बबनराव वाघमोडे(रा. दहिवडी), डॉ. रणजीत तात्यासो काळे (रा. दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (मलकापूर कराड),डॉ. हनुमंत मधुकर खाडे (सातारा) आणि डॉ प्रवीण शांताराम सौद रा. पुणे फार्मासिस्ट व हनुमंत मधुकर खाडे असे या आरोपींची नाव आहे. या आरोपींसह चार डान्सर तरूणींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा : MLA Disqualification : “मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला?”

यावेळी पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्‍यांच्‍यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक शिर्के नावाच्या व्यक्ती असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान उशीरा रात्री पाचगणी पोलीस पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा अधितक तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT