Crime : मुलगा होता बेपत्ता, कुटुंब शोधत शेतात पोहोचलं अन् मातीचा ढीग… पोलिसांना फुटला घाम
वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेताच्या कपाऊंडला विजेचा शॉक लावण्यात आला होता. त्या तारेला स्पर्श होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतीमालकाने घाबरून त्या व्यक्तीला शेतामध्येच पुरले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.
ADVERTISEMENT
Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे जिल्हा हादरून गेला आहे. वन्य प्राण्यांपासून शेतातील पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने कंपाऊडच्या तारेला विजेचा शॉक (Electric shock) लावला होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. मात्र त्यानंतर त्या शेतकऱ्याने घाबरून त्या तरुणाचा मृतदेह शेतातच पुरला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा हादरून गेला होता.
ADVERTISEMENT
कुटुंबीयांनीच घेतला शोध
ज्या तरुणाचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. काही दिवस गेल्यानंतरही पोलिसांकडून तरुणाचा शोध लावण्यात ते अपयशी ठरले होते. त्यामुळे पोलिसांआधीच कुटुंबीयांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. घरातील लोकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर चार दिवसांनी त्याच्यावर पडदा पडला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनाही धक्का बसला.
तारांना विजेचा शॉक
या घटनेची पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, तोहगावमधील गिरीधर धोटे या शेतकऱ्याने शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसा होते, त्यापासून संरक्षण करण्यासाठी कपाऊंडच्या तारांना विजेचा शॉक लावण्यात आला होता. त्या तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर शेतीमालकाने घाबरून तरुणाला शेतामध्येच पुरले होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Crime : मुलींसारखा नटून थटून रिल्स बनवायचा, तरूणाने का संपवलं आयुष्य?
शेतात पुरला मृतदेह
शेतकऱ्याने पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी कपाऊंडच्या तारेला विजेचा शॉक लावला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी 45 वर्षाचे पत्रु वालसू टेकाम त्या तारेजवळून जाताना विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. त्यामुळे पोलिसांआधीच त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवातही केली होता. त्यामुळे ते नेहमी ज्या वाटेने जात होते, तेथील शेतात जाऊन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्यावेळी मृत व्यक्तीचे कुटुंब गिरीधरच्या शेतात गेले त्यावेळी त्याच्याशी बोलताना त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या.
हालचाली संशयास्पद
गिरीधरचे बोलणे आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळेच त्यानी शेताची बारकाव्याने पाहणी केली. त्यावेळी शेतामध्ये एक खड्डा काढलेला दिसला. तो खड्डा काही दिवसांपूर्वीच काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांना त्याचा संशय आल्यानंतर त्यांनी थेट त्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तो खड्डा पुन्हा खोदण्यात आला. ज्यावेळी खड्डा खोदल्यानंतर सगळाच प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी गिरीधरवर गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
…अन् प्रकरण आले उघडकीस
पत्रू वालसू टेकाम शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पत्रू ज्या शेतात जात होते, तेथून त्यांचे कुटुंबीय जात असताना शेतमालक गिरीधर तेथे असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी त्याने त्यांचा फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांना त्याचा संशय आला. शेतात पिकाला पाणी देत असतानाच कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली असता, शेताची पाहणी केल्यानंतर मात्र हे प्रकरण उघडकीस आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Crime : बायको आणि दोन मुलींची हातोडीने ठेचून हत्या, मजूराने स्वत:चचं कुटुंब का संपवलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT