Pune Crime : स्पा सेंटरवर नको ते कृत्य भोवलं, पोलिसांनी छापा टाकताच दोन मुलींसह, तरूणाला अटक!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Police Arrested Prostitution Racket With Two Girls and Accussed Raid On Spa Center In Pune Pimpri-Chinchwad
Police Arrested Prostitution Racket With Two Girls and Accussed Raid On Spa Center In Pune Pimpri-Chinchwad
social share
google news

Pune Prostitution Racket : स्पा सेंटरच्या नावाखाली मुलींचा देह व्यापार करणाऱ्या टोळीला पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सचिन रतन केदारी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मुली आणि आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. (Police Arrested Prostitution Racket With Two Girls and Accussed Raid On Spa Center In Pune Pimpri-Chinchwad)

ADVERTISEMENT

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आयुर्वेद स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना सातत्याने मिळत होती. त्यावर कारवाई करत पोलिसांनी एक पथक तयार करून छापा टाकला. यावेळी आरोपी सचिन रतन केदारी याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

Satara News: खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून घेणार निरोप? शरद पवारांना दिला विशेष सल्ला!

पोलिसांच्या तपासात आणि चौकशीत मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. अलीकडेच पोलिसांनी कानपूर, उत्तर प्रदेश येथील एका हॉटेलवर छापा टाकून काही तरुणी, तरुण आणि दलालांना अटक केली.

हे वाचलं का?

मॉल रोड चौकातील फीलखाना परिसरातील हॉटेल रॉयल गॅलेक्सीमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर एडीसीपींनी प्रथम माहिती देणाऱ्याकडून ही बाब जाणून घेतली. या संपूर्ण माहितीची पुष्टी होताच फीलखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह हॉटेलवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी हॉटेलला घेराव घातला. यानंतर ते आत गेले असता त्यांना खोल्यांमध्ये मुली आणि तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळले.

DA Hike : 47 लाख कर्मचाऱ्यांच्या हातात येणार पैसा, महागाई भत्त्यात होणार इतकी वाढ!

पोलिसांनी हॉटेलमधून चार महिलांसह आठ जणांना अटक केली. यामध्ये दोन दलालांचा समावेश असून, ते मुलींना हॉटेलमध्ये घेऊन जात असत. जिथे असे गैरप्रकार आढळून आले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. हे हॉटेल आशु गुप्ता नावाच्या व्यक्तीचे आहे, जे समरजीत नावाचा तरुण भाड्याने चालवत होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT