15 December 2024 Horoscope: प्रचंड खर्चामुळे 'या' राशीच्या लोकांना येईल नैराश्य! काही लोकांच्या उत्पन्नात होईल भरमसाठ वाढ
15 December 2024 Horoscope In Marathi: वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोणत्या राशींना होईल आर्थिक लाभ?
या राशीच्या लोकांचा खिसा होईल रिकामा
या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी
15 December 2024 Horoscope In Marathi: वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 15 डिसेंबर 2024 ला कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे आणि कुणाला संकटाचा सामना करावा लागणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
मेष राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
वृषभ राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
हे वाचलं का?
मिथुन राशी
कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. आर्थिक खर्चात वाढ होईल.
कर्क राशी
शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> PM Narendra Modi: "भारताच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला..."; संविधानाच्या उत्सवात पंतप्रधान मोदींचं मोठं विधान!
सिंह राशी
नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. क्रोधावर नियंत्रण ठेवा. खर्चामुळं नैराश्य येऊ शकतं. एखाद्या मित्राच्या सहयोगामुळं महत्त्वाचं काम होऊ शकतं.
ADVERTISEMENT
कन्या राशी
आशा-निराशेचे भाव मनात येऊ शकतात. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. आत्मविश्वास कमी होईल. संवादात समतोल ठेवा.
तुळा राशी
आत्मविश्वास वाढेल. मन अस्वस्थ राहील. क्रोधापासून सावध राहा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील.
वृश्चिक राशी
मानसिक आरोग्य चांगलं राहील. एखादं आर्थिक काम होईल. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांवर जाऊ शकता.
हे ही वाचा >> Mutual Fund: 5000 रुपयांची SIP अन् तुम्हीही व्हाल करोडपती! समजून घ्या साधं-सोप्पं गणित!
धनु राशी
आई-वडिलांचं सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकता.
मकर राशी
मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमी राहील. विनाकारण क्रोधी होऊ नका. कामकाजासाठी प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. आईच्या सहकार्यामुळे धनप्राप्ती होईल.
कुंभ राशी
आत्मविश्वास खूप वाढेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वभावात चिडचीडपणा राहील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
मीन राशी
एखाद्या व्यवहाराच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात. काही नातेवाईकांची भेट होऊ शकते. दूरच्या प्रवासासाठी हा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
टीप - सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याची माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT