डेप्युटी एसपीच्या बायकोचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह…पोटच्या पोराचच भयंकर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

police officer son killed his mother in Dehradun capital of Uttarakhand
police officer son killed his mother in Dehradun capital of Uttarakhand
social share
google news

Murder Case: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये (Dehradun) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील दालनवाला पाश भागातमध्ये एक कुटुंबच उद्धवस्त झाले आहे. कारण एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आईची हत्या (mother murder) केल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

मुलाने केली आईची हत्या

डेहराडूनमध्ये असलेल्या जज कॉलनीमध्ये ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एका ५५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांना समजले की, आपल्या आईवर पोलिसाच्या मुलाने धारदार शस्त्राने वार करत आईची हत्या केली होती. आईची हत्या केल्यानंतर त्या मुलाने गळफास लावून घेऊन आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> Murder Case: मायलेकींची गळा चिरून हत्या, सासऱ्याने सांगितली धक्कादायक घटना

मानसिक अवस्था बिघडली

या प्रकरणातील हत्या झालेल्या महिलेचा पती मलखान सिंग हे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी त्यांच्या मुलासोबत डेहराडूनमध्ये राहत होती. मलखान सिंग सुट्टी काढून अनेकदा डेहराडूनला जात असत. याआधीही त्यांनी डेहराडूनमध्येही काही वर्षे नोकरी केली होती. त्यांच्या मुलाची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे त्याचे आणि आईची सतत भांडणे होत होती. त्यातूनच ही हत्या झाली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाने आईची हत्या करण्याआधी मलखान सिंग घरी फोन करत होते. मात्र त्यांची पत्नी फोन घेत नव्हती. त्यामुळे त्यांनी सतत फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर ते जेव्हा घरी गेले आणि घरातील दृश्य पाहिले त्यावेळी मात्र त्यांना धक्का बसला. कारण सगळं घर त्यांचे रक्ताने माखले होते, व पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

हे ही वाचा>> Maratha Reservation : ‘…म्हणून तुम्हाला तुरंगवास भोगावा लागला’, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT