CCTV: पुण्यात तरुणाने थेट महिलेच्या कानशिलात लगावली, उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

A boy slapped a women parking dispute case
A boy slapped a women parking dispute case
social share
google news

A boy slapped a women parking dispute case :पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत पार्कींगवरून मोठा वाद झाल्याची घटना घडलीय. या घटनेत एका तरूणाने महिलेसोबत वाद घालत तिच्या कानशिलात लगावल्याची घटना घडलीय. पुण्याचा कोंढवा (Pune Kondhwa) परीसरात ही घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महिलेने पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे. मात्र अद्याप तरूणाला अटक झाली नाही आहे. (pune parking dispute case a boy slapped a women shocking video viral in social media)

ADVERTISEMENT

पुण्याच्या कोंढवा परीसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत पार्किंगवरून (Parking Dispute) तुफान राडा झाल्याची घटना घडलीय. या घटनेत एका तरूणाने एका महिलेला कानशिलात लगावली होती. तरूणाने महिलेला इतक्या जोरात कानाखाली मारली की, ती महिला जमीनीवर पडली होती. यानंतर महिला उभी राहून पोलिसांना संपर्क करत होती. ही संपूर्ण घटना पार्किंगच्या कॅमेरात कैद झाली होती.त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा : शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीची…

दरम्यान या प्रकरणात महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 27 वर्षीय मुलगी ही फॅशन डिझायनर आहे. ही मुलगी तिच्या सोसायटीमध्ये कार पार्क करत होती. कार पार्क करत असताना तिच्या कारचा धक्का ग्राऊड फ्लोरला राहत असलेल्या मुलाच्या घराच्या दरवाजाला लागला होता. हा धक्का लागल्याने घरातील तरूणाने बाहेर पडत तरूणीशी वाद घालायला सुरूवात केली.

दोघांमध्ये साधारण अनेक मिनिट शाब्दिक वाद झाला. या दरम्यान तरूणीने पोलिसांना फोन वरून तक्रार देण्याचा प्रयत्न करताच मुलाने तिच्या कानशिलात मारली होती. तरूणाने तरूणीच्या कानशिलात इतक्या जोरात मारली होती की तरूणी जागेवरच कोसळली होती. यानंतर उठून परत फोन करायचा प्रयत्न करताना तरूणाने परत तिला कानशिलात मारल्याची तक्रार तिने पोलिसांत दिली आहे.

हे ही वाचा : 6 नायजेरियन तरूणांनी 700 भारतीय महिलांना नादी लावलं, अन्…

या घटनेत तरूण हा प्रायव्हेट सिक्युरिटी देण्याचा व्यवसाय करतो.यासोबत तो काही बॅंकेत तो वसुली एजंटचे काम करत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात उशीर झाला होता, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर तत्काळ तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक झाली नाही आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT