किडनी निकामी, त्यातच डोक्यावर कर्ज, पती-पत्नी मुलाची सामूहिक आत्महत्या
किडनी निकामी झाल्यामुळे आणि कर्जाच्या डोंगरामुळे पती-पत्नी आणि मुलाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. पपईच्या रसात विष मिसळून घेतल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
Mass Suicide New : राजस्थानमधील जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या सामूहिक आत्महत्येत पती, पत्नी आणि मुलाने पपईच्या रसामध्ये विषारी पदार्थ (poisonous substance) मिसळून तिघांनी जीवनयात्रा संपवली. या सामूहिक आत्महत्येमागील (Suicide) कारणही आता समोर आले आहे. त्यामध्ये मृत व्यक्तीच्या दोन्ही किडन्या खराब (Kidney failure) झाल्यामुळे तो या आजाराने प्रचंड त्रस्त होता. त्यातच तो आजारी असल्यामुळे त्याच्यावर कर्जही (Loan) झाले होते. त्यामुळे सर्व कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.
ADVERTISEMENT
मुलालाही पाजले विष
किडन्या निकामी झाल्यामुळे या कुटुंबावर कर्जही प्रचंड झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या या कुटुंबाने आत्महत्येसारखं पाऊल उचलत आपल्या मुलालाही त्यांनी विष पाजले. त्यातच या तिघांचा मृत्यू झाला. जयपूरमधील बालाजी विहारमध्ये ही घटना घडली असून, मृत नवीन जैन हे गेल्या 10 वर्षांपासून पत्नी आणि दोन मुलांसोबत येथे राहत होते.
हे ही वाचा >>Viral News: नवं घर पाहायला गेला, उंबरठ्यात पाय ठेवताच काळाने घातला घाव; एका क्षणात…
आई-बाबा कुणाचा प्रतिसाद नाही
नवीन जैन हे मूळचे नवलगढच्या बसवा गावचे रहिवासी होते. त्यांचे एक मेडिकल दुकान आहे जे सध्या त्यांचा मोठा मुलगा अनुराग सांभाळत आहे. मात्र, गेल्या रविवारी रात्री अनुराग नेहमीप्रमाणे मेडिकलचे दुकान बंद करून घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यानंतर त्यांनी दार उघडण्याची विनंती केली. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचे दार तोडले.
क्षणात कुटुंब संपलं
घराचे दार तोडल्यानंतर आतील दृश्य बघून अनेकांना धक्काच बसला. कारण आई-वडील आणि भाऊ बेशुद्धावस्थेत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यां तिघांनाही तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्यावेळी पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या भावाचा दुसऱ्या दिवशी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा >>‘विरोधात मतदान करा..’, रिलायन्समध्येच Anant Ambani ला विरोध; काय आहे प्रकरण?
ज्यूसमध्ये मिसळले विष
या घटनेची माहिती मिळताच कर्धनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून विषारी गोळ्या आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत 41 वर्षीय नवीन जैन, त्यांची पत्नी 39 वर्षीय सीमा आणि लहान मुलगा 14 वर्षीय मयंक जैन यांनी रविवारी रात्री विषारी पदार्थ असलेले ज्यूस पिऊन त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. नवीन स्वतःच्या आजारपणामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळेच त्याने असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT