Sangli: ‘त्या’ महिलेच्या घरात असतानाच गुंड सच्या टारझनची आधी बोटं तोडली अन्..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sachin Jadhav, a notorious gangster of Sangli, was brutally murdered by a 19-year-old youth. It has come to light that the murder was due to a dispute over an immoral relationship.
Sachin Jadhav, a notorious gangster of Sangli, was brutally murdered by a 19-year-old youth. It has come to light that the murder was due to a dispute over an immoral relationship.
social share
google news

प्रबोधिनी चिखलीकर, सांगली: सांगलीतील (Sangli) कुख्यात गुंड सच्या टारझन उर्फ सचिन जाधव (Sachin Jadhav) याची काल (24 जुलै) धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर वार करुन अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी हल्लेखोर गणेश मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक दाद्या सावंत यांच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सच्या टारझन नुकताच जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्याला सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला आहे. सच्या टारझन याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी वसुली असे अनेक गुन्हे दाखल होते. (sachya tarzan aka sachin jadhav notorious gangster brutally murdered 19 year old youth dispute over immoral relationship sangli crime news)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाड येथील अहिल्यानगरमध्ये आलेल्या सचिन जाधव याची कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी गणेश मोरे (वय 19 वर्ष) याने सचिन जाधवची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गणेशच्या नात्यातील एका महिलेसोबत सचिनचे अनैतिक संबंध होते. ज्याची माहिती ही गणेशला मिळाली होती. याच रागातून गणेशने सचिनची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

हे ही वाचा >> Manipur : ‘जिवंत राहायचं असेल, तर कपडे काढ’, ‘त्या’ पीडितेने सगळंच सांगितलं

सचिन जाधव हा कुख्यात गुंड होता. जो मोक्का अंतर्गत गेले अनेक महिने तुरुंगात होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. याच दरम्यान, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच महिलेच्या घरी असताना अचानक आरोपी गणेश मोरे हा तिथे पोहचला. यावेळी सचिन हा झोपलेला होता. याचवेळी गणेशने आपल्यासोबत जो कोयता आणला होता त्या कोयत्याने त्याने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये सुरुवातीला सचिनच्या हाताची बोटं तुटली. तसेच त्याच्या मानेवर आणि तोंडावर गंभीर वार झाले. ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला.

हे वाचलं का?

त्याला तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> मोदींनी चढवला हल्ला, घेतलं इंडियन मुजाहिद्दीनचं नाव; राहुल गांधींचं प्रत्युत्तर

दुसरकीडे आरोपी गणेश मोरे हा या हल्ल्यानंतर कुठेही पळून गेला नाही. ज्या कोयत्याने त्याने सचिन जाधवची हत्या केली होती तोच कोयता घेऊन गणेश हा कुपवाड पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. इथे त्याने पोलिसांना नेमकी घटना काय घडली याची माहिती देत आपणच हत्या केल्याची कबुली दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

ADVERTISEMENT

तब्बल 9 गुन्हे दाखल असलेला कुप्रसिद्ध सचिन जाधव

हत्या झालेल्या सचिन जाधवची सांगली आणि कुपवाड परिसरात बरीच दहशत होती. कुप्रसिद्ध गुंड असलेल्या सचिनच्या नावावर तब्बल गुन्हे दाखल होते. ज्यामध्ये नगरसेवक दाद्या सावंतच्या खुनाचा देखील गुन्हा त्यांच्यावर दाखल होता. याशिवाय इतरही अनेक गंभीर गुन्हे हे त्याच्या विरोधात दाखल होते. तसंच काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे अवैधपणे अनेक शस्त्रही पोलिसांना सापडली होती. त्यामुळे तो सातत्याने पोलिसांच्या रडारवर होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT