Sakshi Murder Case : “डोक्याचे झाले होते चार तुकडे, पोटातील आतडेही…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sakshis intestines had come out, her head was in 4 pieces, Sahil had brutally murdered her: sakshi's Father
Sakshis intestines had come out, her head was in 4 pieces, Sahil had brutally murdered her: sakshi's Father
social share
google news

Sakshi Murdered by Sahil Case : संतापलेल्या बॉयफ्रेंडने केलेल्या हत्याकांडाने (sakshi murder case delhi) दिल्लीसह देशही हादरला. आरोपी साहिलने अत्यंत क्रूर आणि निदर्यीपणे साक्षीची हत्या केली. हत्येनंतर तिच्या वडिलांनी सांगितलेली माहिती आणखीनच हादरवून टाकणारी आणि साहिलच्या क्रौर्याचा परिचय करून देणारी आहे. (sakshi murdered by sahil news)

ADVERTISEMENT

दिल्लीतील शाहबाद डेरी परिसरात साहिलने साक्षीची हत्या केली. या हत्याप्रकरणाबद्दल बोलताना साक्षीच्या वडिलांनी हादरवून टाकणारा दावा केला. आरोपी साहिलने साक्षीच्या पोटात इतक्या वेळा वार केलेले होते की, तिचे आतडे बाहेर आले होते. इतकंच नाही, तर दगडाने ठेचल्यामुळे साक्षीच्या डोक्याचे चार भाग झाले होते. जे बघून तो मृतदेह साक्षीचा आहे, हेही ओळखायला येत नव्हतं, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा >> ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?

“आम्ही तिथे पोहोचण्याच्या आधी पोलीस पोहोचलेले होते. पोलिसांबरोबरच माझी पत्नीही तिथे पोहोचली होती. माझ्या पत्नीनेच मला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो, मुलीचा मृतदेह बघून मी हादरूनच गेलो”, असं साक्षीच्या वडिलांनी सांगितलं.

हे वाचलं का?

Sakshi Murder case Update : “साहिलबद्दल काहीच माहिती नव्हती”

साक्षीच्या वडिलांनी सांगितलं की, साहिलबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हती. साक्षी किंवा तिच्या मित्रांनी कधीही त्याचं (साहिल) नाव घेतलं नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये काय आहे, हे आम्हाला माहिती नव्हते. ही घटना घडल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की, त्या दोघांमध्ये मैत्री होती. पण, त्यांच्यामध्ये काय बिनसलं होतं, याबद्दल काहीही माहिती नाही.

“ती मैत्रिणीच्या घरून लवकरच येणार होती”

हत्या प्रकरणाबद्दल बोलताना साक्षीच्या वडिलांनी सांगितलं की, ती आता कुठे शाळेत शिकत होती. ती तिच्या मैत्रिणीच्या घरून लवकरच येणार होती. पण, तिचा मृतदेहच घरी आला. ज्या निर्दयी पद्धतीने माझ्या मुलीची हत्या करण्यात आली. ते लक्षात घेता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी साक्षीच्या वडिलांची मागणी आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Thane Crime: बॅगेत सापडली मुंडकं नसलेली महिला.., टॅटूमुळे सापडले नराधम मारेकरी

हत्या केली आणि मावशीच्या घरी जाऊन लपला

दिल्लीतील साक्षी हत्याकांड प्रकरणातील आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर परिसरातून अटक केली. साहिल पहासू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या अटेरना गावात जाऊन लपला होता. साक्षीची हत्या केल्यानंतर साहिल त्यांच्या मावशीच्या घरी लपलेला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT