Gadchiroli : 20 दिवस, 5 हत्या! सुनेच्या खुनी खेळाने हादरला महाराष्ट्र, वाचा Inside Story
sanghamitra kumbhare gadchiroli crime case : गडचिरोली जिल्ह्यातील कुंभारे कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर संघमित्रा कुंभारेंने सगळा कट उघड केला.
ADVERTISEMENT
हसत्या खेळत्या कुटुंबातील लोक अचानक आजारी पडू लागले. गूढ आजाराची लक्षणंही भयंकर होती. आजारी पडल्यानंतर ओठ काळे व्हायला लागले… जीभ ताठ व्हायला लागली… नंतर श्वास घेणंच बंद झालं. २० दिवसांत एकाच कुटुंबातील 5 लोकांचा वेदनादायी मृत्यू झाला. हा आजार काय आहे, हे डॉक्टरांनाही समजले नाही. मात्र मृताच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गूढ मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी जो खुलासा केला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या मृत्यूंमागे कुटुंबातील सुनेचा हात निघाला. पण, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. नंतर तिने हे का केले? कुणाच्या लक्षातही कसं आलं नाही, हे कसं झालं? असे प्रश्न उपस्थित झाले. यात पोलिसांनी संपूर्ण घटनेची इनसाईड स्टोरी सांगितली. (five people death of Kumbhare family, why sanghamitra kumbhare choose arsenic poison)
ADVERTISEMENT
20 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाला भयंकर कट
ही कथा 20 सप्टेंबर 2023 पासून सुरू होते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथे राहणारे शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची प्रकृती खालावली. दोघांनाही डोक्यापासून पायापर्यंत प्रचंड वेदना होत होत्या. दोघांनाही अहेरी येथील रूग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे प्राथमिक उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना चंद्रपूरला नेले. तेथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यातच शंकर कुंभारे यांचा २६ सप्टेंबर रोजी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. शंकर यांच्या पत्नी विजया कुंभारे यांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला होता. दोन दिवसांत कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते. मात्र कुटुंबातील इतर सदस्यही या आजाराला बळी पडू लागले.
गूढ आजार… लक्षणे पाहून डॉक्टरही चक्रावले
शंकर आणि विजया यांची विवाहित मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन कुंभारे यांची प्रकृती खालावली. शंकर कुंभारे यांच्या शेजारी राहणारी मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे हिचीही प्रकृती खालावली. एकामागून एक सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. प्रत्येकाच्या आजाराची लक्षणे सारखीच होती. प्रत्येकाला संपूर्ण शरीरात तीव्र वेदना होत होत्या.विशेषतः खालच्या मागच्या आणि डोक्यात वेदना होत होत्या. प्रत्येकाचे ओठ काळे व्हायचे आणि जीभ जड व्हायची.
हे ही वाचा >> भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’
सुरुवातीला कुंभारे कुटुंबीयांना तसेच डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाल्याची बाब वाटली, पण हळूहळू प्रकरण गुंतागुंतीचे होत गेले. कुंभारे कुटुंबातील लोकांवर उपचार करणारे वेगवेगळे डॉक्टर त्यांच्या आजाराची लक्षणे पाहून आणि वेगवेगळे निदान करूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले, कारण त्यांच्याकडे असे रुग्ण कधीच आले नव्हते.
विषाचे घोट अन् कुंभारे कुटुंबाचा अंत
आधी आजार आणि नंतर मृत्यू असं एक एक करत कुंभारे कुटुंबातील इतरही जणांनी जीव गमावला. कुंभारेंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर अकरा दिवसांनी 8 ऑक्टोबर रोजी तिसरा मृत्यू झाला. यावेळी शंकर आणि विजया यांची मुलगी कोमल दहागावकर हिला जीव गमवावा लागला. कुंभारे कुटुंबीयांच्या दु:खात आणखी भर पडली. लोक भीतीच्या सावटाखाली होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘…तोपर्यंत आम्ही फाशी घ्यायची का?’, गिरीश महाजनांना जरांगेंचा संतप्त सवाल
त्यानंतर सहा दिवसांनी कुटुंबाला चौथा धक्का बसला. 14 ऑक्टोबर रोजी शंकरची मेहुणी आणि विजयाची बहीण आनंदा उर्फ वर्षा उराडे यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी शंकर आणि विजयाचा मुलगा रोशन कुंभारे यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला. अशाप्रकारे 20 दिवसांत कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा आजाराने मृत्यूमुखी पडले. कुंभारे कुटुंबातील मृत्यूसत्राने संपूर्ण गडचिरोली जिल्हाच हादरला.
ADVERTISEMENT
जो कुंभारे कुटुंबीयांच्या आला संपर्कात, तो पडला आजारी
या घटना घडत असल्याने कुंभारे कुटुंब आणि त्यांच्या ओळखीचे सर्वजण हादरून गेले. कामानिमित्त दिल्लीत राहणारा कुंभारे कुटुंबातील मोठा मुलगा सागर कुंभारे हा ही आजारी असल्याची माहिती मिळाली. त्यालाही या आजाराची काही लक्षणे कुटुंबातील इतर लोकांसारखीच आहेत. खरंतर आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळताच सागर दिल्लीहून गडचिरोलीला आला होता.
आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारांना हजर राहून तो दिल्लीला पोहोचला तेव्हा त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. प्रकृती इतकी खराब झाली की त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करावे लागले. शंकर आणि विजया यांना ज्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले होते, तिचा चालक राकेश मडावी यांचीही प्रकृती बिघडली.
पाच जणांच्या मृत्यूने पायाखालची सरकली जमीन
चालक राकेश मडावी यांनाही चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याचप्रमाणे शंकर कुंभारे यांच्या मेहुणीचा मुलगा, जो आपल्या आजारी नातेवाईकांच्या मदतीसाठी दुसऱ्या ठिकाणाहून चंद्रपूरला पोहोचला होता, तोही आजारी पडला. त्यालाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
हे ही वाचा >> Crime : 22 दिवसांनी होते तरुणीचे लग्न, मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली अन्…
या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती, ती म्हणजे जे लोक गडचिरोलीत राहत होते किंवा तिथे गेले होते, तेच आजारी पडत होते किंवा मरत होते. गडचिरोलीपासून दूर असलेल्या कुटुंबीयांना ना कोणत्याही आजाराने बाधा झाली ना कोणाचा मृत्यू झाला. म्हणजे गडचिरोलीतल्या त्या घरात किंवा कुंभारे घरात असं काहीतरी होतं जे लोकांना आजारी पाडत होतं. कारण एकाच कुटुंबातील पाच जणांचा एकाच वेळी मृत्यू होणे ही गोष्ट भयंकर होती.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय होते मृत्यू कारण?
या पाच मृत्यूंनी महागावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या मृत्यूंबद्दल जोरदार चर्चा रंगली होती. विशेषत: लोक म्हणत होते की या मृत्यूमागे काळी जादू म्हणजेच अंधश्रद्धा आहे. या मृत्यूंमुळे गडचिरोली पोलीसही सतर्क झाले. दरम्यान, नागपुरातून मृत्यू झालेल्यांचे वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.
हे ही वाचा >> ‘…म्हणून महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात’, सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
खरंतर, डॉक्टरांना देखील मृत्यूचे कारण स्पष्टपणे समजू शकले नव्हते. वैद्यकीय अहवालात हृदयविकाराचा झटका आणि अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र इतक्या लोकांच्या बाबतीत अचानक असे कसे झाले हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. पहिला संशय कुंभारे कुटुंबातील सून संघमित्रा हिच्यावर गेला. कारण कुंभारे कुटुंबातील सर्व लोक आजारी पडत होते आणि एकापाठोपाठ एक मरत होते, पण संघमित्रा ठणठणीत होती.
कुंभारे कुटुंबाची सून संघमित्राची चौकशी अन्…
पोलिसांनी कुंभारे कुटुंबाची सून संघमित्रा हिला चौकशीसाठी बोलावले आणि सगळ्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडले. संघमित्राने आधी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर लोक आजारी पडत असताना, ती ठणठणीत कशी, या प्रश्नावर ती अडकली. सासरच्या लोकांच्या मृत्यूमागे तिचा हात असल्याचे तिने मान्य केले. इतकंच नाही तर या कटात तिची एक मावशी रोजा रामटेके हिचाही हात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांना धक्का बसला.
त्यानंतर पोलिसांसमोर असा प्रश्न उभा राहिला की, संघमित्रा आणि रोजा रामटेके यांचे कुंभारे कुटुंबाशी असे कोणते वैर होते? कुंभारे कुटुंबीयांना मारण्यासाठी त्यांनी कोणते विष वापरले, ज्यामुळे मृत्यूचे कारणही स्पष्ट झाले नाही. एवढे विचित्र विष त्यांच्याकडे कुठून आले? या हत्येत फक्त दोघांचाच हात आहे की यामागे आणखी कोणी आहे? पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची होती, त्यासाठी तपास सुरू झाला.
संघमित्राच्या कटात रोजा रामटेके का झाली सहभागी?
गडचिरोली पोलिसांनी संघमित्रा आणि रोजा यांना ताब्यात घेतले. संघमित्राची चौकशी केली असता तिने कुंभारे कुटुंबातील मुलगा रोशनसोबत घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचे उघड झाले. संघमित्राच्या वडिलांना तिच्या लग्नाचे इतके दुःख झाले की त्यांनी आत्महत्या केली.
दुसरीकडे लग्नानंतर रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांनी संघमित्राचा छळ करण्यास सुरुवात केली आणि तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. यामुळे तिचा राग यायला लागला. तिला त्यांचा बदला घ्यायचा होता. दुसरीकडे रोजा रामटेके यांचा कुंभारे कुटुंबाशी जमिनीवरून वाद सुरू होता. महागावातीलच जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी तिला कुंभारे कुटुंबातील लोकांना मार्गातून हटवायचे होते. त्यामुळे कुंभारे कुटुंबाप्रती त्यांच्या मनात वाढलेल्या द्वेषाची माहिती दोघांनीही एकमेकींना सांगितल्यावर दोघींनी मिळून कुंभारे कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.
सून ठरली कुंभारे कुटुंबीयांसाठी ‘काळ’
अकोल्याची रहिवासी असलेल्या संघमित्राने कृषी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेले आहे. ती टॉपर होती. त्यामुळे तिला अनेक प्रकारच्या विषांची, कीटकनाशकांची चांगली माहिती होती. आर्सेनिक सारखा जड धातू माणसाला फक्त आजारीच बनवत नाही तर मृत्यूलाही कारणीभूत ठरतो हे तिला माहीत होते. आणखी महत्त्वाचं म्हणजे तो रंगहीन आणि गंधहीन असल्याने तो एखाद्याला खाऊ घातला तर त्याला त्याची जाणीवही होत नाही. इतरांनाही त्याबद्दल कळत नाही.
संघमित्रा गुपचूप प्रत्येकाच्या जेवणात आर्सेनिक मिसळू लागली. कुंभारे कुटुंबीयांच्या मदतीसाठी आलेल्यांना तिने तेच विष मिसळून अन्न किंवा पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर लोकही आजारी पडू लागले. नंतर ह्रदय बंद पडून आणि अवयव निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दोघींना अटक करण्यासोबतच रोजाचे पती प्रमोद रामटेके यालाही ताब्यात घेतले असून, त्याच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. या कटाची माहिती प्रमोदला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT