Kolhapur : बलात्कार प्रकरण अन् पत्नी, मुलाला पाजले विष; स्वतःचा चिरला गळा!
बलात्काराच्या प्रकरणात एक महिना अटकेत असलेले गडहिंग्लज येथील अर्जून उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय 46, रा. गांधीनगर) यांनी टोकाचे पाऊल उचलले.
ADVERTISEMENT
Kolhapur Crime News : बलात्काराच्या प्रकरणात एक महिना अटकेत असलेले गडहिंग्लज येथील अर्जून उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे (वय 46, रा. गांधीनगर) यांनी टोकाचे पाऊल उचलले. संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी शिंदे (वय 36) आणि मुलगा अर्जून शिंदे (वय 14) यांना विष दिले. तर त्यानंतर चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. या घटनेने गडहिंग्लज शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
दरवाजा उघडला अन् शेजारी हादरले
गडहिंग्लजमधील गांधीनगर येथे संतोष शिंदे यांचं घर आहे. शनिवारी सकाळी शिंदे आईने त्यांच्या बेडरुमचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला.
हेही वाचा >> Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर
शेजारी आल्यानंतर त्यांनी संतोष शिंदे यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी बेडरुममध्ये तिघांचे मृतदेह पडलेले दिसले. संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा अर्जून याला विष पाजले. त्याचबरोबर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आता गडहिंग्लज पोलिसांनी सुरु केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बलात्कार प्रकरण काय?
माजी नगरसेविकेने संतोष शिंदे यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. माजी नगरसेविकेने संतोष शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात बेळगाव पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
संतोष शिंदे यांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी ते एक महिना तुरुंगात होते. त्यानंतर जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर ते या प्रकारामुळे तणावाखाली होते, अशी माहिती आहे. या प्रकारातून सावरण्याचा प्रयत्न करत होते मात्र, नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केलं असावं, असं सांगण्यात येतंय. मात्र, शिंदे यांच्या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले असून, शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
कोण होते संतोष शिंदे?
संतोष शिंदे यांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं होतं. त्यांनी हसूरचंपू येथे अर्जून रिफायनरी नावाने खाद्यतेल निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. महाराष्ट्रासह कर्नाटकातही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला होता. त्यांनी विराज फूड्स नावाने बेकरी उत्पादनांचा प्रकल्प आणि अर्जून फिटनेस नावाने जिमही सुरू केल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT