Seema Haider : ’72 तासांत सीमाला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर…’, कुणी दिली धमकी?
सीमा हैदरला 72 तासांत पाकिस्तानात पाठवले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा गौ रक्षा हिंदू दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी दिले आहे. एकीकडे अशा धमक्या आणि आंदोलनाची भूमिका समोर येत असतानाच भारताच्या तपास यंत्रणेकडून मात्र सीमा हैदरच्याच्याप्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे
ADVERTISEMENT
Seema Haider Protest: सोशल मीडियासह, देशभरात सध्या सीमा हैदरची खूप चर्चा रंगली आहे. पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरमुळे (Seema Haider) सध्या दोन्ही देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान एकीकडे सीमा हैदरवरून हिंदु मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी पाकिस्तानी डाकू देत असताना, दुसरीकडे सीमा हैदरला 72 तासांत पाकिस्तानात पाठवले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा गौ रक्षा हिंदू दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी दिले आहे. एकीकडे अशा धमक्या आणि आंदोलनाची भूमिका समोर येत असतानाच भारताच्या तपास यंत्रणेकडून मात्र सीमा हैदरच्याच्याप्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे आता भारत सरकार यावर काय निर्णय घेते? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (seema haidar sachin meena lovestory gau raksha dal protest threat)
ADVERTISEMENT
गौ रक्षा हिंदू दलाचे म्हणणे काय?
सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणाचं (Sachin meena) PUBG गेमवर प्रेम जुळलं होतं. या प्रेमापोटी सीमा हैदरने पाकिस्तान सोडून दुबईवरून नेपालमार्गे भारतात शिरकाव केला होता. यावेळी तिने सचिन मीणासोबत लग्न देखील केले होते. ही गोष्ट समोर येताच सोशल मीडियावर दोघांची चर्चा रंगली होती. दरम्यान अशाप्रकारे अवैधपणे एका पाकिस्तानी महिलेने भारतात शिरकाव केल्यानंतर पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक देखील केली होती. मात्र न्यायालयाने त्या दोघांना जामीन मंजूर करत सुटका केली होती. सध्या सीमा तिच्या चार मुलांसह सचिन मीणाच्या रबूपुरा परीसरात राहत आहेत.
हे ही वाचा : Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
पाकिस्तानातून सीमा भारतात आल्यापासून भारताला अनेक धमक्या दिल्या जात आहे. 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. याचसोबत सीमा हैदरला पाकिस्तानात परत न पाठवल्यास हिंदु मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी देण्यात येत आहे. पाकिस्तानातून अशा धमक्या येत असतानाच भारतात देखील सीमाला विरोध होत आहे. गौ रक्षा हिंदू दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी सीमा हैदरला भारतातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. जर येत्या 72 तासांत तिला भारतातून बाहेर न केल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा वेद नागर यांनी दिला आहे.
हे वाचलं का?
सीमा हैदर 72 घंटे मे देश से बहार नही गयी तो सीधे होगा आन्दोलन वेद नागर @myogiadityanath @myogioffice @dgpup @Uppolice @UPGovt @ANINewsUP @dmgbnagar @noidapolice @CP_Noida @dr_maheshsharma @SubratPathak12 @ManojTiwariMP @bpsarojmp @news24tvchannel @ABPNews @ZeeNews @BBCHindi pic.twitter.com/u768b80soy
— Ved Nagar Hindu (@vednagar4bjp) July 16, 2023
वेद नागर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सीमा हैदर सामान्य महिला नसून ती एक पाकिस्तानी गु्प्तहेर असून भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो,असे वेद नागर यांनी म्हटले आहे. पाचवी नापाससोबत वेगवेगळ्या भाषांसह इंग्रजीत बोलणारी सीमा हैदर सामान्य महिला नाही आहे. सीमा आणि तिच्या चारही मुलांना 72 तासांच्या आता देशाबाहेर न केल्यास आंदोलन छेडू, देशद्रोही महिलेला भारतात खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका वेद नागर यांनी मांडली आहे.
ADVERTISEMENT
सीमा हैदरवर तपास पथकांची नजर
दरम्यान उत्तर प्रदेशची एटीएसची टीम सीमा हैदर प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास नोएडा पोलिस करत आहे. नोएडा पोलिसांनी सुरुवातीला तपास केल्यानंतर हे प्रकरण स्पेशल एजन्सीकडे पाठवले होते. युपी एटीएस सोबत नोएडा युनिट आणि एक हेडक्वार्टर युनिट या घटनेचा तपास करत आहेत. सर्व एजन्सी सीमा हैदरचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यावर लक्ष ठेवून आहे. याचसोबत युपी एटीएस टीम सीमा हैदरच्या पाकिस्तानवरून दुबई आणि नंतर नेपाळमार्गे भारतात येण्याच्या संपूर्ण रूटची तपासणी करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर
दरम्यान पाकिस्तानातून येणाऱ्या धमक्या आणि भारतातून सीमा हैदरला वाढता विरोध पाहता आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT