दिल्लीत नवा डाव, अमित शाह गेले शरद पवारांच्या घरी, 'ही' भेट अन् बरंच काही!
भाजपचे गृहमंत्री अमित शाह हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ज्यावरून आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हे आज (12 डिसेंबर) थेट राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्याचनिमित्ताने ही भेट घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केल्यास ही भेट नक्कीच साधीसुधी नसल्याचं आता बोललं जातंय.
ADVERTISEMENT
एकीकडे आज सकाळी अजित पवार यांनी सहकुटुंब आणि आपल्या पक्षातील इतर महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन शरद पवारांची भेट घेतली होती. अशावेळी शरद पवार आणि अमित शाह यांच्या आजच्या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे.
अमित शाह यांनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्यांनी प्रत्यक्ष भेटीसाठी पवारांची वेळही मागितली. ज्यानंतर त्यांनी 5 वाजेच्या सुमारास शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
हे वाचलं का?
आता ही भेट फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घेण्यात आली होती असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील एकूण राजकीय वातावरण पाहता ही भेट एवढी सहजासहजी नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT