Exclusive: सीमा हैदरचे तपास यंत्रणांनाच आव्हान, म्हणाली, ‘DNA,नार्को टेस्ट…’
सीमा हैदरने आज तकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सीमा हैदरने तिच्यावरील सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. आजतकने घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सीमा हैदर ISIची एजंट आहे का? असा सवाल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
पाकिस्तानातून प्रेमाखातर भारतात आलेल्या सीमा हैदर (seema haider) आणि सचिन मीनाच्या (sachin meena) लव्हस्टोरीची देशभरात चर्चा आहे. हे कपल चर्चेत आल्यापासून त्यांच्या लव्हस्टोरी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सीमा हैदरवर तर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात भारतातील विविध तंपास यंत्रणा सीमा हैदरची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत सीमा हैदरवर seema haider) संशय तर बळावतोय, पण ती पाकिस्तानी एजंट असल्याचे ठोस पुरावे अद्याप तरी सापडले नाही आहेत.आता सीमा हैदरने आज तकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सीमा हैदरने तिच्यावरील सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. (seema haider exclusive interview i am ready for dna and narco test sachin meena love story)
ADVERTISEMENT
आजतकने घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सीमा हैदर ISIची एजंट आहे का? असा सवाल करण्यात आला होता. या प्रश्नावर सीमा हैदर म्हणते की, मी ISI एजंट नाही आहे. तपास एजंसीने अनेक दिवस माझी चौकशी केली, आता ही माझी चौकशी करत आहेत. पण आता मी माझी सत्यता सिद्ध करण्यासाठी नार्को टेस्ट किंवा डीएनए टेस्ट करायला तयार आहे, असे थेट आव्हानच सीमा हैदरने आता भारतीय तपास यंत्रणांना दिले आहे.
हे ही वाचा : Exclusive : ‘नग्न धिंड, बलात्कार अन्…’, माजी सैनिकाने सांगितली ‘त्या’ व्हिडिओची हादरवून टाकणारी गोष्ट
हिंदु संस्कृतीची ट्रेनिंग घेऊन भारतात पाठवले आहे का? असा सवाल सीमा हैदरला करण्यात आला होता. यावर सीमा म्हणते, आता मी पाहिले की माझ्यामुळे हिंदु मुलींना मुस्लिम बनवण्यात आले. पाकिस्तान ही काही नवीन गोष्ट नाही आहे. पाकिस्तान दरदिवशी हिंदु मुलींना जबरदस्ती मुस्लिम बनवले जाते. फक्त बातम्या आता दाखवल्या जात आहेत, असे सीमाने सांगितले.
हे वाचलं का?
पाकिस्तानात परतलण्यावर सीमा हैदर म्हणते की, जर मी पाकिस्तानात गेले तर मला मारून टाकतील. काही लोक माझ्याविरोधात व्हिडिओ जारी करतायत, असे देखील सीमा हैंदर म्हणाली आहे. तसेच मला अटक झाल्यानंतर 3 दिवस विविध एजेन्सीने माझी कठोर चौकशी केली, असे देखील सीमा हैदर म्हणाली आहे.
ADVERTISEMENT
सासऱ्यांचा गंभीर आरोप
सीमा हैदरचा सत्य जाणून घेण्यासाठी आज तकची टीम पाकिस्तानातील लाल खां झकरानी या गावातील सीमा हैदरच्या सासरी पोहोचली होती. यावेळी सासरे अमीर जान यांनी सीमावर गंभीर आरोप केले. सीमा हैदर 2014 साली झालेल्या लग्नानंतर दोनदाच सासरी आली आणि त्यानंतर कराचीत राहायला लागली. सासरच्या मंडळींशी सीमा हैदरचे नाते फारसे चांगले नसल्याचे गावातील नागरीकांनी आजतकला सांगितले. सीमा हैदर आमच्या नातवंडाचे भविष्य स्वत: ठरवू शकत नाही, असे म्हणत अमीर जान यांनी भारत आणि पाकिस्तान सरकारकडे आपल्या नातवंडाना परत पाठवण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT