आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharon raj murder case kerala thiruvananthpuram
sharon raj murder case kerala thiruvananthpuram
social share
google news

Sharoj Raj Murder Case : देशभरात खुनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. एका गर्लफ्रेंडने स्वत:च्याच बॉयफ्रेंडचा (Sharoj Raj) हळु हळु स्लो पॉईजन देऊन जीव घेतलाय. विशेष म्हणजे, एका ज्योतिषाच्या सल्ल्यानंतर शिक्षित तरूणीने बॉयफ्रेंडच्या खुनाचा कट रचला होता. दरम्यान एकमेकांवर जीवापाड़ प्रेम करणाऱ्या या कपलमध्ये असं झालं तरी काय की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या जीवावरच उठली होती.चला तर जाणून घेऊयात. (sharon raj murder case kerala thiruvananthpuram girlfriend killed boyfriend slow poison juice)

ADVERTISEMENT

मुलीच्या कुंडलीत दोष

केरळच्या तिरूअनंतपुरम मध्ये 23 वर्षीय गृष्मा ही तिच्या कुटुंबासोबत राहायची. अभ्यासात ती खुप हूशार होती.इंग्लिश लिटरेचरमध्ये बीए केल्यानंतर ती डबल एमए करण्याच्या तयारीत होती. आणि संपूर्ण युनिवर्सीटीत चौथी आली होती. गृष्माच्या कुटूबियांनी तिच्यासाठी स्थळ देखील पाहिले होते. मुलगा हा मिलेट्रीमध्ये होता. दोघांच्या कुंडल्या देखील ज्योतिषांना दाखवल्या होत्या. यामध्ये गृष्माच्या कुंडलीत ज्योतिषांना दोष आढळला होता. जर गृष्माने लग्न केले तर तिच्या नवऱ्याचा काही महिन्यात मृत्यू होईल असा दावा ज्योतिषांनी केला होता. त्यामुळे गृष्मा आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता.आता तिच्यासमोर दोनच पर्याय उरले होते. एक तर हे स्थळ नाकारावा किंवा एक कठीण उपाय करावा. यावर गृष्माच्या कुटुंबियांनी कठीण उपाय करण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र हा निर्णय़ किती भयानक होतो, हे तुम्हाला पुढे कळणार आहे.

हे ही वाचा : जावयाचा सासूवर बलात्कार, अश्लील फोटो काढले अन् म्हणाला…

हे वाचलं का?

गर्लफ्रेंडच्या भेटीनंतर तब्येत खालावायची

एकीकडे गृष्मासाठी कुटुंबियांनी स्थळ पाहिले होत, तर दुसरीकडे ती 24 वर्षीय शेरॉन राज नावाच्या तरूणासोबत नात्यात देखील होती. दोघं एकमेंकावर खुप जीवापाड प्रेम करायचे. शेरॉन राज गृष्माला प्रत्येक आठवड्यात भेटायचा. या प्रत्येक भेटीनंतर त्याची तब्येत खराब व्हायची.मात्र काही दिवस उलटल्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा चांगली व्हायची. गृष्माच्या ज्योतिषाच्या भेटीनंतर या घटना शेरॉन सोबत घडत होत्या. दरम्यान 15 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉन आपल्या मित्रासोबत गृष्माला भेटायला गेला होता. या भेटीत गृष्माने त्याला एक आयुर्वेदीक ज्युस दिला होता. हा ज्युस पिल्यानंतर शेरॉन मित्रासोबत घऱी निघाला, यानंतर त्याला उलट्या व्हायला सुरुवात झाली. मित्रांनी यावेळेस त्याला कसे बसे घरी नेले. मात्र घरी जाऊनही त्याच्या तब्येतीत सुधार न झाल्याने कुटूंबियांनी त्याला रूग्णालयात नेले.

ब्लड रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

रुग्णालयात शेरॉनचे अनेक रिपोर्ट काढण्यात आले,यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. शेरॉनच्या शरीरीताल अवयव एक एक करून काम करणे बंद करते होते. शेरॉनच्या तब्येत दिवसेंदिवस इतकी बिघडत होती की त्याला आयसीयुत दाखल करण्यात आले होते. तब्येत सुधारणा होत नसल्याने 25 ऑक्टोबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शेरॉनचा मल्टी ऑर्गन फेल्युर झाला आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘नायक नहीं खलनायक हूं…’ गाणं म्हणत दिराने वहिनीला संपवलं, कारण अनैतिक…

 पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

शेरॉनच्या मृत्युनंतर त्याच्या कुटूंबियांना गृष्मावर शक बळावला. कारण त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर शेरॉनची तब्येत खालावायची. आणि ही घटना देखील गृष्माच्या भेटीनंतरच झाली होती. त्यामुळे शेरॉनच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात गृष्मा विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शेरॉनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या पोस्टमार्टम अहवालात त्याला मृत्युपूर्वी विष देण्यात आल्याचे समोर आले होते. या विषने फक्त त्याची तब्येतच खालावली नाही तर त्याच्या शरीरातील अंग देखील निकामी झाले होते. ज्यामुळे अवयव काम करणे बंद झाले होते आणि त्याचा हार्ट फेल झाला. हा रिपोर्ट पाहून कुटुंबियांच्या पायाखालचीच जमीन सरकली.

ADVERTISEMENT

गृष्माने असा कट का रचला?

ज्या मुलावर गृष्मा जीवापाड प्रेम करायची त्या शेरॉन विरूद्ध तिने असा कट का रचला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.तर यामागचे कारण तो ज्योतिष होता. या ज्योतिषाने काही उपाय सुचवले होते. त्यामध्ये गृष्मा ज्याही मुलाची लग्न करेल त्याचा मृत्यू होईल. हे फक्त पहिल्या लग्नातच होणार आहे. तर तिचे दुसरे लग्न चांगले चालेल असा दावा ज्योतिषाने केला होता. त्यामुळेच गृष्माने बॉयफ्रेंड शेरॉनचा बळी देऊन आपलं दुसर लग्न वाचवण्यासाठी थरारक हत्येचा कट रचला होता.

किटकनाषकांना मारणार विष द्यायची

शेरॉनची पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर गृष्माने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली. गृष्मा ज्युसच्या नावाखाली प्रत्येक भेटीत विष द्यायची. हे किटकनाषकांना मारणार विष असायचे. गृष्माने स्लो पॉईजन देऊन त्याचा जीव घेतला होता. गृष्माच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.दरम्यान तिला जेलमध्ये टाकल्यानंतर तिने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम तिरुअनंतपुरममध्ये घडला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलंय.

हे ही वाचा : साखरपुड्यानंतर बलात्कार… लग्न दुसऱ्या मुलीशीच, नवरदेवाची पोलिसांनीच काढली वरात!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT