Shraddha Walkar : ‘आफताबने गळा दाबून मारले, नंतर…’, वडिलांनी कोर्टात काय सांगितलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shraddha Walker's father said during cross examination that Shraddha had told her mother and me that Aftab used to beat her.
Shraddha Walker's father said during cross examination that Shraddha had told her mother and me that Aftab used to beat her.
social share
google news

Shraddha Walker Aftab Poonawalla Story : वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीसोबत काय घडलं, हे देशात पोहोचलंय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरची हत्या केली गेली होती. आणि त्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. या हत्याकांडप्रकरणी साकेत न्यायालयात श्रद्धाच्या वडिलांची आणि भावाची साक्ष नोंदवली गेली. यादरम्यान श्रद्धाच्या वडिलांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. (shraddha walker father said in the court that Aftab strangulated her with his own hands)

ADVERTISEMENT

उलटतपासणीदरम्यान, श्रद्धा वालकरच्या वडिलांनी सांगितले की, आफताबने पोलीस ठाण्यात सांगितले की, त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले.

Nanded Crime: फळ विक्रेत्याने दोन्ही हात कोयत्याने तोडले, कारण फक्त हसला अन्…

श्रद्धा वालकरच्या वडिलांनी उलटतपासणी दरम्यान सांगितले की, आफताब तिला मारहाण करत असे श्रद्धाने तिच्या आईला आणि मला सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्र पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा तक्रार दाखल केली. दिल्लीतील साकेत न्यायालयात शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे श्रद्धा खून प्रकरण?

मुंबईत राहणारी श्रद्धा वालकर बंबल या डेटिंग अॅपच्या माध्यमातून आफताब पूनावालाला भेटली. दोघांमधील संवाद वाढला आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, श्रद्धाचे कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते.

वाचा >> Nilima Chavan News : नीलिमा मृत्यू प्रकरणी SBI प्रोजेक्ट मॅनेजरला अटक, कारण…

त्यानंतर श्रद्धा आणि आफताब दिल्लीला गेले आणि मेहरौलीच्या छतरपूर भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. मे 2022 मध्ये लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि संतापलेल्या आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जवळच्या जंगलात फेकून दिले.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांना होता आफताबवर संशय

श्रद्धाच्या हत्येची घटना तिच्या एका मैत्रिणीमुळे उघडकीस आली होती. श्रद्धाच्या एका मैत्रिणीने तिच्या वडिलांना सांगितले की बऱ्याच दिवसांपासून तिच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे श्रद्धाच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. मुंबई पोलिसांनी आफताबची दोनदा चौकशी केली. श्रद्धाचे कॉल डिटेल्सही तपासले. त्यावरून कळले की तिचा फोन मे 2022 पासून बंद आहे. मुंबई पोलिसांना आफताबचा संशय आल्याने त्यांनी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT